आगामी सर्वच निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार ! अण्णासाहेब कटारे



ठाणे(प्रतिनिधी) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद ठाणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे अण्णासाहेब कटारे यांचे ठाणे जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार असे  राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना सांगितले*.
यावेळी 
ठाणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल  चौधरी यांची मुरबाड विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी उमेदवारी जाहीर केली

संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने सुरू असून दररोज जुने जाणते नेते,युवा, युवती ,महिला व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहे.
आम्ही रिपब्लिकन पार्टीने  हे समाज जोडो अभियान संपूर्ण देशात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतले आहे सर्वच समाजघटकांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सोबत घेतले असून रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी पदाधिकारी/कार्यकर्ते जीव पाड मेहनत घेत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली समस्त नेते/कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.
 ठाणे येथील बैठकीस 
राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर,ठाणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौधरी,ठाणे जिल्हा महिला आघाडी रंजना ताई कदम,जनसंपर्कप्रमुख सचिन नांगरे,उत्तर भारतीय ठाणे जिल्हा नारायण पांडे,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव,ठाणे शहर अध्यक्ष युवा आघाडी साईनाथ खरात,दिवा शहराध्यक्ष रमेश तुपे,भुजंगराव सोनकांबळे महासचिव,वंदना होटकर सचिव,सुवर्णा औटी संघटक,दीपा जाधव उपाध्यक्ष,शाईन खान मुंबई प्रदेश संघटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!