शिर्डी (प्रतिनिधी)आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये पहिले सुवर्ण पद जिंकणारे भारतीय खेळाडू अविनाश साबळे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, या वेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी.शिवा शंकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.
२९ वर्षीय अविनाश साबळे यांनी चीन मधील हांगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:१९.५० सेकंदात शर्यत पूर्ण करुन राष्ट्रीय विक्रम केला आहे, त्यांनी सन २०१८ च्या जकार्ता गेम्समध्ये इराणच्या होसेन केहानीने बनवलेला ८ मिनिटे आणि २२.७९ सेकंदांचा मागील आशियाई क्रीडा विक्रम मोडला आहे. ते ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले असून त्यांनी ५ हजार मीटर शर्यतीत रौप्य पदकही मिळविले आहे.
अविनाश साबळे हे महाराष्ट्रातील बीड येथील रहिवाशी असुन, वयाच्या सहाव्या वर्षापासून धावण्याचा सराव करत आहे. १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले.
अविनाश साबळे यांनी आज आपल्या वडीलांसह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला.
0 Comments