सावळीविहीर बुद्रुक महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी जिजाबा आगलावे व उपाध्यक्षपदी संदीप विघे यांची निवड!

शिर्डी (प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी जिजाबा शुक्लेश्वर पा.आगलावे तर उपाध्यक्षपदी संदीप रमेश विघे यांची नुकतीच ग्रामसभेत सर्वानुमते निवड झाली आहे. 
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ओमेश साहेबराव जपे पा.हे होते.सावळीविहीर
बुद्रुक येथे झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच अशोकराव आगलावे पा. माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल वाघमारे, यांच्यासह जिजाबा शुक्लेश्वर आगलावे व संदीप रमेश विघे, दिनेश आरणे हे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. यावेळी ग्रामसेवक कारले  यांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष पदासाठी असणाऱ्या अटी व शर्ती वाचुन दाखवल्या. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यानंतर सरपंच ओमेश जपे यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्षपदी जिजाबा शुक्लेश्वर आगलावे पा. तर उपाध्यक्षपदी संदीप रमेश विघे यांची निवड झाल्याचे घोषित केले. महात्मा गांधी सावळीविहीर बुद्रुक गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जिजाबा आगलावे व उपाध्यक्ष पदी संदीप विघे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सरपंच ओमेश साहेबराव जपे पा.
उपसरपंच विकास नानासाहेब जपे पा. तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. त्यानंतर नवनिर्वाचित तंटामुक्तीचे अध्यक्ष जिजाबा आगलावे व उपाध्यक्ष संदीप विघे यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या चरणी जाऊन दर्शन घेतले.नंतर अनेक संस्था, संघटना, आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने अध्यक्ष  जिजाबा आगलावे व उपाध्यक्ष संदीप विघे यांचा सत्कार करण्यात आला .तसेच त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. तंटामुक्तीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जिजाबा आगलावे हे राहता पंचायत समितीचे माजी सभापती असून संदीप विघे हे अहमदनगर( उत्तर) जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे