मुरबाड दि.१७(बाळासाहेब भालेराव) मुरबाड कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवळे गावापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आंबेळे(बु) येथील ऐतिहासिक मठ येथे रविवार १९२०२३ रोजी आंबेळे (बु.) येथे मुरबाड व शहापूर आगारात सेवा करुन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्नेहमेळावा सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सेवानिवृत्त जीवन जाणून घेण्याची उत्सुकता आहे.त्याचप्रमाणे अडचणी व यावर उपाय योजना राबत चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.त्याचप्रमाणे रा.प.महामंडळाची सेवानिवृत्त कर्मचारी बाबतची भूमिका यावर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाने केले आहे.
0 Comments