मुरबाड दि.१३(बाळासाहेब भालेराव) मुरबाड मध्ये सहकारी संस्थेच्या सर्व सचिवांनी जागरूक राहून कर्ज वसुलीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे प्रतिपादन ठाणे जिल्हा सहकारी बँक संचालक तथा ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवले येथील व्हाईट हाऊस मध्ये केले.तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेना ठाणे जिल्हा संहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी मुरबाड तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थाचे चेअरमन,सचीव व बँक अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांना शिवळे येथे फराळ व भेट वस्तू देवून सन्मानीय करुन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक ठाणे-पालघर सचीव संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल म्हाडसे यांनी करुन सचीवांच्या समस्या मांडल्या.
सुभाष पवार यांनी सहकारी संस्थेबाबत केंद्र व राज्य सरकारची भुमिका मांडून सचीव लोकांनी खुप जागरुक राहावे,कर्ज वसुलीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, बँकेचे प्रतिनिधी सुनील देसले यांनी कर्ज वसुलीबाबत मार्गदर्शन केले. ठाणे -पालघर सहकारी बोर्ड कल्याणचे संचालक प्रकाश पवार सर यांनी , आपल्या भाषणात डिसेंबर महिन्यात चेअरमन व सचीव यांचे प्रशिक्षण बोर्ड व बँकेमार्फत घेण्याचे सांगितले.पञकार व चेअरमन बाळासाहेब भालेराव यांनी सहकारी संस्थाच्या समस्या मांडल्या.
याप्रसंगी ह.भ.प. रामभाऊ दळवी,शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन किसन गिरा,व्हाईस चेअरमन जयवंत हरड व तालुक्यात सर्व सहकारी संस्थाचे चेअरमन व सचीव उपस्थित होते
0 Comments