प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात नवीन मुख्याध्यापक आल्यानंतर शाळेचा सर्वच दृष्टीने झाला कायापालट!पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे समाधान व्यक्त!

लोहगाव (प्रतिनिधी)
आशिया खंडात सर्वात मोठे असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात नवीन मुख्याध्यापक आल्यापासून येथे शैक्षणिक तसेच इतर  भौगोलिक सोयी सुविधा वाढल्या असून शिक्षणाच्या बाबतीत व मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत येथे नियमिता दिसून येत आहे. कोणी शिक्षक व मुख्याध्यापक असो स्वतःच्या प्रामाणिक कर्तव्य व शिस्तबद्ध काम करण्याची इच्छा असली की ते आपले शाळा, शिस्त शैक्षणिक गुणवत्ता हे चांगल्या प्रकारे बदलू शकतात याचे उत्तम उदाहरण महात्मा गांधी विद्यालयातील नवीन मुख्याध्यापक आल्यानंतर पाहायला मिळत आहे. काही दिवसातच या विद्यालयाने आपली पूर्वीची मरगळ झटकून एक शैक्षणिक नवी पाऊले उचलल्यामुळे या शाळेचे विद्यार्थी पालक वर्गातून कौतुक होत आहे.

राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे प्रशिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय हे अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखा विविध ठिकाणी असल्यामुळे येथे शिक्षक मुख्याध्यापक नेहमी बदलत असतात. मात्र जो मुख्याध्यापक शिक्षक आपल्या प्रामाणिक कर्तृत्व करतो. शिस्तबद्ध व आपल्या कामकाजावर अधिक लक्ष देतो . कोणत्याही शाळेत कार्यरत असो, आपली शाळा समजून प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे काम करतो.त्या शाळेला नक्कीच गुणवत्ता असते. काही दिवसापूर्वी येथे शाळेला शिस्त नव्हती. शाळेमध्ये खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, पक्षांनी विस्टा केलेल्या बेंच, त्यांच्या शाळेच्या आवारात कोणीही फेरफटका मारायचे या सर्व गोष्टी चालत होत्या .पालकांनीही शाळेत तक्रारी केल्या होत्या. मात्र नवीन मुख्याध्यापक येथे रुजू झाल्यानंतर या शाळेचा कायापालट झालेला दिसून येत आहे. येथे सुरुवातीलाच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्यांची नोंदणी केली जाते पालक असो शिक्षक असो विद्यार्थी असो येताना जाताना नोंदवहीत नोंद केली जाते. येथे भरपूर सेक्युरिटी वाढवली आहे. त्यामुळे इतर टवळांचा विद्यार्थ्यांना होणारा त्रास आता कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही. शिक्षक असो विद्यार्थी असो आपल्या वेळेत विद्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच स्वच्छता आरोग्य विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, सुरक्षितता, बसण्यासाठी चांगल्या बेंच, सुंदर व स्वच्छ असे वातावरण, या गोष्टीही महत्त्वाच्या असून त्या गोष्टींकडे नवीन मुख्याध्यापक यांनी अधिक लक्ष दिले आहे व येथे गेल्या काही दिवसात येथे मोठी सुधारणा झाल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!