राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाभळेश्र्वर ग्रामपंचायत मध्ये ना राधाकृष्ण विखे पाटील, मा सौ शालिनीताई विखे पाटील व खा डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाची एकहाती सत्ता आहे बाभळेश्वर गावच्या सरपंच कै सौ विमलताई म्हस्के यांचे निधन झाल्याने सरपंच पद रिक्त झाले होते या रिक्त जागेची निवड बुधवारी पार पडली या निवडणुकीत सौ संगीता श्रीकांत शिंदे पा यांच्या नावाची एकमुखी सूचना मांडल्याने एकच आर्ज दाखल झाला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकीचे कामकाज अध्यासी अधिकारी सौ वैशाली मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले, यावेळी सरपंच संगीता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी. पंचायत समिती माजी उपसभापती बबलू म्हस्के, प्रवरा कारखाना संचालक साहेबराव म्हस्के, प्रवरा बँक संचालक शंकर बेंद्रे, प्रवरा बँक माजी संचालक दादासाहेब म्हस्के, पोलीस पाटील काकासाहेब म्हस्के,उपसरपंच राहुल डहाळे तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब बेंद्रे, माजी उपसपंच अमृत मोकाशी , सोसायटी चेअरमन दौलत बेंद्रे, माजी उपसरपंच अजित बेंद्रे, एकनाथ शिंदे, विष्णु शिंदे ,रणजीत शिंदे, विश्वास शिंदे ,सतीश शिंदे ,नवनाथ शिंदे ,सागर शिंदे, ज्ञानदेव शिंदे, प्रदीप शिंदे ,शुकलेश्वर शिंदे, हेमंत शिंदे, तलाठी मंडलिक भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी आर ए शेख तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments