मुरबाड दि.२१(बाळासाहेब भालेराव) मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्ट्यात तसेच मुरबाड शहर परिसरात वर्षाकाठी एकदाच भात पीक घेतलं जात आहे त्यानंतर अर्थात भात सराईनंतर मुरबाड तालुक्यात रब्बी पीक हंगामाला जोरदार सुरुवात होत असते त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्यात १५५२.२० हेक्टरवर कडधान्य पिकाची लागवड करण्यात आली आहे तसेच ५९६.३६ हेक्टर वर भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. तसेच रब्बी हंगाम पीक पेरणी मध्ये मूग, हरभरा, वाल,चवली,मसुर, भुईमूग, भेंडी, काकडी,शिराळी,कारली,वांगी,घोसाळी,दुधीभोफला,मिरची,कांदा, कलिंगड इत्यादी पिकाची लागवड करण्यात आली आहे त्यासाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची काळजी घेत आहे कारण या कडधान्य व रब्बी पिकातूनच मिळणारे उत्पन्न याच उत्पन्नावर आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी बसली जाते. रब्बी हंगामात शेतकरी वर्ग आपल्या वेगवेगळ्या भाजीपाल्या पिकाच्या बाबत व्यस्त असतो त्याचमुळे मुरबाडची ढोबळी मिरची, तसेच भेंडी व काकडी ही एअरपोर्टवर जात असल्याने मुरबाडच्या भाजीपाल्या पिकाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
रब्बी हंगाम पिक पेरणी पुढील प्रमाणे:-
पिकांची नावे. हेक्टरी लागवड
उडीद. १०९
मुग. १३७
हरबरा. ७५०
भुईमूग. २.९
चवली. ३६.९५
मसुर. ८.७५
भेंडी. ३५५.७
काकडी. ९६.२५
वाल. ५१०
शिराळी. १२.९
कारली. २३.९५
वांगी. ३१.४
घोसाळी. ८.७
दुधी. ८.१५
मिरची. ५४.२१
कांदा. ३.३
कलिंगड. २.३
0 Comments