श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त लोहगाव येथेही मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम करत मोठा जल्लोष साजरा!


लोहगाव( प्रतिनिधी) छत्रपती एक्सप्रेस  .अयोध्या येथील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राहता तालुक्यातील लोहगाव येथेही विविध कार्यक्रम करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
लोहगाव येथे सर्व राजकीय मतभेद विसरून सर्वजण एकत्रित येऊन श्रीरामाचा जयजयकार करत मोठ्या उत्साहात आनंदात श्रीरामाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावातून मेन रोडने श्रीरामाची ,श्री लक्ष्मण, सीतामैय्या व श्री हनुमानाची वेशभूषा करून तीन मुले ही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ते या मिरवणुकीत मोठे आकर्षण ठरत होते. शाळेतील मुले यांचे नृत्य, लेझीम पथक तसेच महिला, ग्रामस्थ यांचाही श्रीरामांच्या गीतांवर नृत्याचा ठेकाधारीत मोठा आनंद या मिरवणुकीतून दिसून येत होता. मिरवणुकीनंतर मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. अयोध्या येथे श्रीराम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर लोहगाव येथे श्रीरामाचा जयजयकार करत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. गावात सर्वत्र भगवे झेंडे, भव्य पताका लावण्यात आल्या होत्या. एकूणच 22 जानेवारीला लोहगाव येथे सर्वत्र श्री रामाचा जयजयकार व भगवे वातावरण दिसून येत होते.या भव्य मिरवणुकीत लोहगाव (तांबेनगर) येथील म्हसोबा महाराज देवस्थान येथे प्रभू श्रीरामाचे पूजन करून पुढे लोहगाव कडे फटाक्याच्या आतिषबाजी सह श्रीरामाचा जयघोष करत श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान रक्षा स्त्रोत पठण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी
लोहगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य , माजी सरपंच ,उपसरपंच, सोसायटी चेअरमन, माजी चेअरमन, सदस्य लोहगाव ग्रामस्थ, तांबे नगर, व्यापारी परिवार, तरुण वर्ग, महिला, भाजप युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष, विखे कारखान्याचे माजी तज्ञ संचालक आदी मान्यवरांसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे