मुरबाड मध्ये सत्तर वर्षापासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाड रेल्वेला अर्थसंकल्प स्थान मिळाल्याने मुरबाडकरांचा स्वप्न होणार साकार !



मुरबाड प्रतिनिधी, (बाळासाहेब भालेराव )     संपूर्ण राज्याच्या बहुतांशी  भागात रेल्वेचे जाळे पसरले आहे त्यामुळे मुरबाडकरांच्या मुरबाडच्या रेल्वे प्रकल्प गती कधी मिळणार तसेच प्रत्येक केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुरबाड रेल्वेच्या प्रकल्प स्थान मिळत नव्हते परंतु भारत सरकारचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी गेली दोन ते तीन वर्षे सतत रेल्वेच्या प्रकल्पासाठी केंद्रामध्ये पाठपुरावा करत होते अखेर १ फेब्रुवारी २०२४ चा अर्थसंकल्प यंदा स्थान मिळाले असून त्या प्रकारासाठी १० कोटी ३६ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तमाम मुरबडकरांच्या वतीने भारत सरकारचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद झाल्यामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहे त्यामुळे मुरबाडकरांचे ७० वर्षे स्वप्न साकार होणार आहे परंतु याबाबत हा प्रकल्प रद्द झाल्याच्या अफवा निराधार आहेत कोणत्याही परिस्थितीत मुरबाड रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होईल अशी ठाम ग्वाही भारत सरकारचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी दैनिक ठाणे जीवनदीप वार्ताशी बोलताना दिली.
गेल्या ७० वर्षापासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो मुरबाडकरांच्या मागणीनुसार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बोलल्याप्रमाणे कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्प मंजूर केला या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे अवघ्या महिन्याभरात सर्वेक्षण पूर्ण होणार हा देशातील पहिला रेल्वे प्रकल्प ठरला होता. त्यानंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत तर शेतकऱ्यांनाही कोणत्याही परिस्थितीत जमीन अभावी प्रकल्पाचे काम थांबणार नाही अशी स्वागतार्ह भूमिका घेतली आहे.तर रेल्वे मार्ग जाणार असलेल्या भागात शेती केली जात असून जमिनीचे व्यवहार रजिस्टड झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला रेडीरेकनरनुसार कमी भाव मिळत आहे या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वेळा बैठक झाली आहे त्यानंतर या शेतकऱ्यांना सन्मानजनक किंमत देण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
तसेच मुरबाड रेल्वे प्रक्रियेसाठी तरतूद झाली होती. मात्र हा प्रकल्प सुरू न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम करण्यासाठी अर्थसंकल्पात हेड उघडला जातो त्यात यंदा १० कोटी ३६ लाखाची तरतूद झाली आहे या हेडमुळे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पातून वाढीव रक्कम मंजूर करता येते दुसऱ्या वर्षी हेड तयार केल्यामुळे हा प्रकल्प रेल्वेच्या यादीमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे
***मुरबाड कल्याण रेल्वे कशी असणार**
*मुरबा रेल्वे मार्गावर तीन मोठे फूल उभारण्यात येणार
*३९ छोटे पूल आहेत
*५ उडान पूल
*१० भुयारी मार्गिका
तसेच कल्याण मुरबाड रेल्वे मार्गात ७ बोगदे उभारण्यात येणार आहेत त्यातील सर्वात मोठा बोगदा ८५० मीटरचा असेल सध्या मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण मार्गावर पारसिकचा बोगदा आहे आता मुरबाड मार्गावर बोगदा केला जाईल तसेच रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेसाठी ७२६ कोटी ४५ लाख निधी मंजूर केला आहे या खर्चाची ५०% खर्च राज्य सरकार उचलणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!