संगमनेर (प्रतिनिधी) कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचा राज्यस्तरीय स्वर्गीय सेठ सिताराम सुखदेव बिहाणी बंगडीवाला विशेष प्रतिभा सन्मान पुरस्कार संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील कृषीभुषण विठ्ठलदास बालकिसन आसावा यांना नुकताच सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.
सम्राट चौकातील महेश भवन येथे राज्यस्तरीय सृजन २०२४ बैठक आयोजित करण्यात आली होती.या भव्यदिव्य सोहळ्यात आमदार विजयराव देशमुख,उद्योगपती लक्ष्मीकांत सोमाणी, बंगडीवाला उद्योगसमूहाचे जितेंद्र बिहाणी यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा सतिश चरखा जुगलकिशोर लोहिया भिकुलाल मर्दा, जिल्हाध्यक्ष जवाहर जाजु,मंत्री किरणकुमार राठी,महासभेचे प्रतिनिधी चंद्रकांत तापडिया सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वीचे प्रवरा परीसर तालुकाध्यक्ष ब्रिजमोहन बिहाणी सचिव जगदिश सारडा यांनी विठ्ठलदास आसावा यांचे नामांकन केले.अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती सचिव अतुल डागा यांनी प्रस्ताव तपासणी करून राज्यस्तरावर सादर केला होता.प्रदेश पुरस्कार समिती सदस्य गोपाल बजाज(सांगली), शामसुंदर मर्दा(इचलकरंजी),सुरेश भराडिया(नांदेड), राकेश सोमाणी(खारघर),रामसुख मंत्री(नगर), मनमोहन कासट(सांगली)यांनी राज्यभरातून आलेल्या प्रस्तावाची छाननी करून विठ्ठलदास आसावा यांना पुरस्कार जाहीर केला.
या दिमाखदार सोहळ्यात राज्यभरातून आलेले समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments