सोनगाव,( प्रतिनिधी) शकूर तांबोळी - लोणी येथील लहान मुलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच सोनगाव सात्रळ परिसरामध्ये शांतीनगर भागात एक तरुण सचिन दादू पलघडमल हा तरुण शेळ्या चरित असताना दुपारी अडीच वाजता अचानक बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला प्रसंगावधान राखून या तरुणाने हातातील काठीच्या सहाय्याने बिबट्यावर हल्ला चढवला शेळीचे मुंडके धरलेले असताना तरुणाने केलेल्या हल्ल्यामुळे बिबट्याने शेळीचे मुंडके सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला या झटापटीमध्ये सचिन पलघडमल हा तरुण किरकोळ जखमी झाला असला तरी त्याच्या या धाडसामुळे शेळीचे प्राण वाचले आहे मात्र इतर शेळ्या व सचिन पलगडमल भेदरलेल्या अवस्थेत अवस्थेत पळत घरी आला व सर्व हकीकत सांगितली भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सोनगाव सातराव धानोरे परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाला या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बिबट्यांचे प्रमाण या परिसरात वाढल्याने ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे तरी संबंधित वनाधिकारी यांनी लवकरात लवकर बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये लवकरात लवकर पिंजरे लावा असे मागणी या परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत
0 Comments