प्रस्तावित पुणा- शिर्डी -नाशिक रेल्वे मार्गाबरोबरच रोटेगाव पुणतांबा हा नवीन रेल्वे मार्ग करण्यात यावा-- साईभक्त व प्रवाशांची मागणी

शिर्डी  (प्रतिनिधी)
नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे मार्गातील बोगद्यांचा खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारने ही रेल्वे शिर्डी मार्गे वळविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिर्डी सह परिसरात मोठे समाधान व्यक्त होत आहे. शिर्डी हे श्री साईबाबां मूळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे.  शिर्डीला आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच आंतरराष्ट्रीय बस स्थानक त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन पुणतांबा कडून शिर्डी पर्यंत रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नाशिक हा रेल्वे मार्ग बदलून पुणा शिर्डी नाशिक असा करणार असल्याचे नुकतेच घोषित केल्यामुळे पुना शिर्डी नाशिक असा रेल्वे मार्ग होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी मुंबईत तशी चर्चा झाली असल्याचे समजते.साई भक्तांना साई दर्शनसाठी शिर्डीला येण्यासाठी हा मार्ग मोठा सोयीस्कर ठरणार आहे. असे साईभक्त मधून बोलले जाते.
 
नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमधून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. केंद्रीय समितीकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 
महारेल’हा मार्ग तयार करणार आहे. 
पहिला नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग हा २३५ कि.मी. होता. आता हा मार्ग ३३ किलोमीटरने वाढणार असून, त्याला शिर्डी जोडले जाईल, असा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या मार्गावर १२ ते १६ डब्यांची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे. सध्याच्या मार्गावर एकूण २० स्थानके, १८ बोगदे आणि १९ उड्डाणपूल आहेत. परंतु, या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे असा पर्याय निवडण्यात आला आहे.
 शिर्डीमधून  हा जाणारा रेल्वेमार्ग नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. येथे देश विदेशातून साईभक्त येत असतात. येथे रेल्वे स्टेशन आहे. पुणतांब्याहून शिर्डीला रेल्वे मार्ग टाकण्यात आला आहे. हाच रेल्वे मार्ग पुणंताबाहून रोटेगाव असा आणखी नव्याने वाढवण्यात आला तर औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद व तेलंगणा, आंध्र प्रदेश ओरिसा आदी राज्यातून शिर्डीला येणाऱ्या रेल्वे यांनाही अधिक सोयीचे होईल. भक्तांचा वेळ वाचेल. सध्या काकीनाडा साईनगर शिर्डी ,पुरी ते साईनगर शिर्डी ,हावडा ते  साईनगर शिर्डी, विशाखापटनम ते साईनगर शिर्डी, हैदराबाद ते साईनगर शिर्डी ,अशा अनेक रेल्वे ह्या औरंगाबादहून वैजापूर जवळील रोटेगाव वरून नगरसुल मनमाड जातात ‌ मनमाडहून येवला कोपरगाव पुणतांबा व मग नंतर शिर्डीला साईनगर रेल्वे स्थानकात येतात. मोठा वळसा रेल्वेला घालावा लागतो सुमारे 120 ते 25 किलोमीटरच्या पुढे अंतर आहे. त्यामुळे अंतर लांब पडते व वेळही जातो. तेव्हा शिर्डी पुणतांबा रेल्वे मार्ग आहेच .मात्र पुणतांबा ते रोटेगाव हा सुमारे 30 35 किलोमीटरचा  रेल्वे मार्ग नव्याने केला व पुणतांबा गोदावरी नदीवर रेल्वेचा मोठा पूल आहे. त्याच्या अलीकडे कोपरगाव बाजूला रोटेगाव पुणतांबा रेल्वे मार्ग जोडला तर सर्वदृष्टीने फायदेशीर होऊ शकते व साई भक्तांचाही त्यामुळे वेळ वाचू शकतो. अंतर ,खर्च वाचू शकतो.त्याचप्रमाणे पुना शिर्डी नाशिक असा रेल्वे मार्ग झाल्यानंतर पुना शिर्डी  बरोबरच औरंगाबाद नांदेड अंतर रेल्वेने जवळ होईल. पुणतांबा व शिर्डी जंक्शन रेल्वे स्टेशन होतील. त्यामुळे शिर्डीला अनेक रेल्वे यांची ये जा वाढेल. आर्थिक दृष्ट्या शहराचां त्यामुळे विकास होईल.  शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना संपूर्ण देशातून  रेल्वेने येणे सोयीचे होईल. वेळ वाचेल. त्यामुळे पुणा शिर्डी नाशिक रेल्वे मार्ग करण्याबरोबरच पुणतांबा ते रोटेगाव हा रेल्वे मार्ग नव्याने करण्यात यावा. जेणेकरून ऐतिहासिक नगरी पुणतांबा, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी या शहरांनाही त्याचा अधिक फायदा होईल. साईभक्तांनाही फायदा होईल व परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी  , विद्यार्थी,प्रवासी यांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करून महाराष्ट्र शासन, महरेल व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात विचार करून लवकर निर्णय घ्यावा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नुकतेच शिर्डीला साई दर्शनाला येऊन गेले .त्यांनी या संदर्भात विचार करून रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा. अशी साईभक्त व प्रवासी वर्गाची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे