त्या जादूटोणा निखाऱ्यावर चालवलेल्या गुन्ह्याकामीमुरबाड पोलिसांनी फरारी आरोपी देवर्षीच्या आवळल्या मुस्क्या..!


मुरबाड दि.१६- (प्रतिनिधी )   काही दिवसापूर्वी मुरबाड तालुक्यातील करवेळे गावामध्ये अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रकरणी आघोरी कृत्य करून एक वयोवृद्ध इसमाला जळत्या निखाऱ्यावरती चालवून चटके लागल्याने याप्रकरणी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हायाची नोंद करण्यात आली होती त्यामुळे फिर्यादी महिलेच्या सांगण्यावरून सत्य घटना डोळ्यासमोर पाहिलेल्या फिर्यादींनी व साक्षीदारांनी घडत असलेल्या अघोरी प्रथेबद्दल मुरबाड पोलिसांनी आठ जणांवरती सी.आर.६५/२०२४ भा.दं.वि कलम ३०८,४५२,३२४,३२३,३४१,१४३,१४७,३४ सह महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला होता त्यापैकी सात गुन्हेगार पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.परंतु देवर्षी उर्फ देवा हरी म्हसकर हा मुख्य मांत्रिक फरार होता मुरबाड पोलिसांनी शहापूर,आसनगाव,कर्जत, लोणावळा,अलिबाग येथे शोध घेतला होता परंतु सदर देवर्षी भोंदू बाबा भिवंडी येथे आहे अशी माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर,  पवार, . पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक.आगिवले, पोलीस कॉन्स्टेबल उदमले यांनी  मुरबाड  वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली दिवस-रात्र शोध घेऊन मुरबाड पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली आहे.सदर आरोपीला मुरबाड न्यायालयात   हजर केला असता त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे