शिर्डी (प्रतिनिधी )राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी परिसरात असणाऱ्या पुरातन व प्रसिद्ध अशा श्री रोकडोबा ,हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर येथे तुकाराम बीजे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुकाराम बीजेच्या दिवशी बुधवार 27 मार्च 2024 रोजी राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी परिसरात असणाऱ्या पुरातन अशा श्री रोकडोबा, हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर येथे सकाळपासूनच पूजा विधी, धार्मिक कार्यक्रम ,प्रवचन ,कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. साई कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड यांचे किर्तन झाले. भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा व सर्व कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. तुकाराम बीजे निमित्त येथील श्री रोकडोबा बाबा हनुमान मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
येथिल हा श्री रोकडोबा परिसर हा अगदी शांत ,रमणीय असा परिसर असून येथे भव्य असे मोठे वडाचे झाड व इतर वृक्ष आहेत. उन्हाळ्यात अगदी गारवा देणारे ही वृक्ष व निवांत वातावरण भाविकांना नक्कीच मोहून टाकते.
येथे काशी येथील ब्राह्मण पुजारी राहत असून ते येथे मंदिरात सेवा, पूजा ,आरती करतात. तुकाराम बीजे निमित्त येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साफसफाई, रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत. या कार्यक्रमासाठी सावळीविहीर बुद्रुक व कारवाडी चे ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.
0 Comments