बुथ सशक्तिकरण करण्याबरोबरच जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांनी घ्यावी मोठी जबाबदारी--ना. विखे पा‌. सावळीविहीर बुद्रुक येथील बुथ प्रमुखांच्या संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आवाहन!

शिर्डी ( प्रतिनिधी)   नरेंद्र मोदीच हे देशाचे तिसऱ्यांदा  पंतप्रधान होणार आहेत. पण त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे असून आप की बार 400 के पार! यासाठी जिल्ह्यातील दोन्हीही महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी जिल्ह्याचा मोठा सहभाग असला‌ पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली पाहिजे. असे सांगत ‌देश ,राज्य पातळीवर काम करताना अनेक योजना राबवल्या जातात. त्याची अंमलबजावणी होण्याकामी कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे.व  बूथ सक्षमीकरण होणेही महत्त्वाचे आहे .असे मत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील 
सावळीविहीर बुद्रुक येथे बुथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भागचंद लोढा हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच ओमेश जपे, सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे,मा.पं.सं.सदस्य साहेबराव जपे ,राहाता बाजार समितीचे संचालक शांताराम जपे,पं.स.मा.सभापती जिजाबा आगलावे,  सावळीविहीर खुर्दचे मा. सरपंच अशोकराव जमधडे, महेश जमधडे,सा.वि.बु चेउपसरपंच विकास जपे, गणेश आगलावे,मा. सरपंच मोहन मोरे, सोपान पवार, कैलास सदाफळ,सचिन भैरवकर, पोलीस पाटील सौ सुरेखा वाघमारे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला सावळीविहीर ग्रामपंचायत तसेच खंडकरी शेतकरी, व मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांना दफनभूमीसाठी जागा दिल्याबद्दल ना. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांशी संवाद सांगताना ना.विखे पुढे म्हणाले की, देशामध्ये नरेंद्र मोदी च्या माध्यमातून केंद्र तसेच राज्यातही विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबवून समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन विविध माध्यमातून नागरिक जोडले जात आहेत. मोफत रेशन धान्य, आनंदाचा शिधा ,अन्नद्योय योजना, रोजगार, घरकुल, महिलांसाठी उपक्रम, लखपती दीदी हा नवीन महिलांसाठी उपक्रम, अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या योजना लाभार्थी पर्यंत गेल्या पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. त्यासाठी पुस्तिकाही काढली आहे. आता विविध योजना ,उपक्रमाचे लाभार्थींना थेट अनुदान दिले जाते. त्यामुळे मधले लिकेज थांबले आहे. असे सांगत नागपूर, रत्नागिरी यासह शिर्डी येथील नियोजित एमआयडीसी मध्ये देशाच्या संरक्षणासाठी लागणारे साहित्य निर्मिती होईल .असा नव्याने प्रस्ताव आला असून त्यामुळे या परिसरात मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे .त्यासाठी तरुणांना प्रशिक्षणाचीही व्यवस्था होणार आहे . दहावी ,बारावी तसेच छोटे-मोठे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना ही प्रशिक्षण देऊन रोजगार मिळणार आहे. 
सावळीविहीर येथे पशु वैद्यकीय महाविद्यालय तसेच शिर्डी येथे 25 एकरात श्री साईबाबांच्या जीवनपटावर आधारित लेसर शो आधारित असे उद्यान निर्माण होणार असल्यामुळे हा परिसर तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे ‌. सावळीविहिर गावाला सुमारे 125 कोटीची 26 एकर जमीन गावठाण म्हणून जमीन विनामूल्य सार्वजनिक कामाच्या विकासासाठी दिली आहे. शेती महामंडळाच्या वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक केले आहे. त्यामुळे मोठा खर्चही वाचला आहे. या जमिनी विनामूल्य करून दिल्या पण याचे मोल नागरिकांनी पुढेही लक्षात ठेवले पाहिजे. असेही यावेळी ते म्हणाले. सध्या लोकसभा निवडणुका लागल्या आहेत. आपल्यावर अकोला, नाशिक, दिंडोरी ,अहमदनगरची जबाबदारी आहे. तसेच स्टार प्रचारक म्हणून आणखीनही जबाबदारी वाढली आहे .
मान.नरेंद्र मोदींना परत पंतप्रधान करण्यासाठी व आपला त्यासाठी मतदारसंघाचा सहभाग मोठा असावा .यासाठी येथील लोकसभेचा उमेदवार तो मग कोणीही असो विखे असो की लोखंडे असो त्यांना विजयी करावे. व कार्यकर्त्यांनी एक जबाबदारी म्हणून हे काम पार पाडावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्व उपस्थितांना केले. शेवटी गणेश कापसे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सुरेश वाघमारे, रमेश आगलावे, रामदास आगलावे, अ.फ शेख गुरुजी, प्रदीप नितनवरे, आशिष आगलावे, संजय जपे ,रमेश कसबे , दिलीप गायकवाड, राजेंद्र जपे ,राजेंद्र आगलावे, कसबे, अमोल भोसले, सागर आरणे, दत्तू आगलावे,स्वप्निल पारडे, गणेश बनसोडे, किरण आगलावे, सुनील आगलावे, सतीश गायकवाड, राजेंद्र जपे, नाना कदम ,निलेश आरणे , पप्पू आगलावे, शिवाजी आगलावे,रावसाहेब एखंडे, शरद गडकरी, आनंद जपे, कैलास पळसे, सुभाष फाजगे, ऋषिकेश जाधव, रावसाहेब आगलावे, महेश जपे, विठ्ठल आगलावे, सतीश जपे, अशोक कुर्हे, भारत संघवी, भाऊसाहेब सातदिवे,कापसे,विलास कदम,गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष चेअरमन, संचालक, सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, बचत गटातील महिला, युवक, बूथ प्रमुख, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे