मुरबाड दि.१०(बाळासाहेब भालेराव ) ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या वीट उत्पादक मालकांवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोकण विभाग वीट उत्पादक चालक-मालक संघटना व मुरबाड तालुका वीट उत्पादक चालक-मालक संघटना यांच्या विद्यमाने निर्धार सभेचे आयोजन मुरबाड तालुका अध्यक्ष महेश देसले यांनी व त्यांच्या कमिटीने संपूर्ण नियोजन केले होते वीट भट्टी मालकावर होणाऱ्या खोट्या ॲट्रॉसिटी चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे तसेच अवकाळी पावसामुळे लाखो रुपयाचे नुकसान हे वीट भट्टी धारकांची होते त्यासाठी शासनाने मदत द्यावी यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचा वेळ घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात येईल कोणतीतरी संघटना कातकरी समाजातील कामगारांना भडकावून वीटभट्टी चालकांवर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करतात पण हे सर्व स्वताच्या फायद्या साठी या संघटना करतात त्यामुळे संपूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे संपूर्ण महाराष्ट्रात आज कातकरी समाजाची सख्या कमी होत चाललेली आहे ह्या गोष्टी कडें ह्या संघटना लक्ष देत नाहीत तसेच ह्या समाजाला शासकीय योजना लाभ मिळाव्या यासाठी विट्ट भट्टी मालकांनीही पुढे यावे म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करता पण कातकरी समाजाच्या संघटना याबद्दल काही आवाज उठवत नाहीत ते फक्त वीट भट्टी मालक आणि कामगार यांच्यातच वाद लावतात मी आज आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे असे मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितले तसेच सर्व अधिकारी व पोलीस यंत्रणा यांना माझे सांगणे आहे की कोणत्याही वीट भट्टी मालकावर गुन्हा दाखल करताना सखोल चौकशी करूनच करा असे त्यांनी बोलताना सांगितले. या वेळेस मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी जगन्नाथ शिंदे, शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, टोकवडा पोलीस निरीक्षक राजकुमार रक्कमजी, किनवली पोलीस निरीक्षक खैरनार, पंचायत समितीच्या माजी सभापती स्वरा चौधरी, माजी सभापती दीपक पवार, वीट भट्टी मालक वैभव पाटील, दिलीप घोरड, पालघर जिल्हाध्यक्ष बंडू पाटील, मुरबाड सचिव अजय गोरले, अंबरनाथ तालुका अध्यक्ष नरेंद्र शेलार, शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर भोईर, भिवंडी तालुका अध्यक्ष सुभाष सांबरे, युवा समाजसेवक मनोज देसले, सचिन चौधरी, राम कराळे, रमेश घरत मुरबाड तालुक्यातील सर्व वीट भट्टी चालक-मालक उपस्थित होते.
0 Comments