मुरबाड दि.११(बाळासाहेब भालेराव)मुरबाड तालुक्यातपन्नास वर्षांपासून राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणुन ओळख असणारे चंद्रकांत बोष्टे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे आदेशाने जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी यांनी शिवनेरी शासकीय विश्रामगृह मुरबाड येथे निवड केल्याने राजकीय क्षेत्रात आगरी समाजाला राष्ट्रवादीने कुठेतरी स्थान दिल्याने तमाम आगरी समाज बांधव एकवटला असुन त्यांनी बोस्टे यांचे स्वागत केले आहे.
आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अजित पवार यांचे पक्षाचे संघटन वाढिस लागावे व पक्ष तळागाळातील पोहोचला जावा.यासाठी तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे गरजेचे आहे.त्यासाठी पक्षाचे निरिक्षक देखील कार्यकर्त्यांची चाचपणी करत असताना मुरबाड तालुक्यात गेले अनेक वर्षे राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेले आगरी समाजाचे एक आदर्श व्यक्तिमत्व चंद्रकांत बोष्टे यांनी बाजार समिती,बारवी प्रकल्प पिडित संघटनेचे नेतृत्व तसेच आसोळे सेवा सोसायटीचे संचालक पद अशी विविध पदे भुषविली असुन त्यांचे अंगी असलेले संघटनात्मक कौशल्य पाहून तसेच इतर राजकीय पक्षात आगरी समाजाला कुठेच स्थान नसल्याने चंद्रकांत बोष्टे यांचेवर मुरबाड तालुका अध्यक्ष पदाची धुरा टाकल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments