मुरबाड दि.२५(बाळासाहेब भालेराव) होळीचा सण संपूर्ण देशात आनंदात -उत्साहात साजरा केला जतो, पण गोर- गरीब, अनाथ बाळक या सणापासून वंचित राहिले जातात त्यामुळे अशा बालकांची होळी गोड जावी तसेच त्यांना सुद्धा पुरणपोळीचा आस्वाद घेता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचें ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी यांच्या संकल्पने नुसार रायते ग्रामस्थ आयोजित एक पुरणपोळी अनाथ बालकांनसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला, यामध्ये गावातील अनेक महिला-पुरुष, बालक,विविध क्षेत्राततील मान्यवर,राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठया उत्साहाने अनाथ बालकांनसाठी पुरणपोळ्या जमा करताना दिसत होते, यात संपूर्ण गाव आपले राजकीय हेवे-दावे बाजुला ठेऊन एकजुटीने काम करताना पहायला मिळाले,
रायते गावातून जमा झालेल्या पुरणपोळ्या या, जीवन संवर्धन फॉउंडेशन म्हसकल व समतोल फॉउंडेशन मामनोली येथील अनाथ आश्रमात वाटप करण्यात आल्या ,यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व स्मिथ हास्य पाहवून गावातील नागरिकांना एक वेगळाचअनुभव पहावयास मिळाला
या कार्यक्रमासाठी रायते गावच्या सरपंच समिता सुरोशी,उपसरपंच मयूर सुरोशी,ग्रामपंचायत सदस्य,तसेच शिवसेना (उबाठा गट ) जिल्हा सन्व्ययक संतोषजी सुरोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी,भाजपा कल्याण तालुका सरचिटणीस देविदास सुरोशी, माजी सरपंच सुनील सुरोशी, नरेश सुरोशी,श्रीकांत तारमले, मिलिंद चंदणे, विजय सुरोशी, अमोल सुरोशी, पत्रकार नारायण सुरोशी, दिनेश राऊत, संतोष कोर, रमेश सुरोशी, गावातील महिला पुरुष व नागरिकांनी मोठया संख्येने उवस्थिति दर्शविली*
याउपक्रमात सर्वांनी सहभाग घेतल्या बद्दल
ग्रामस्थ मंडळ रायते यांच्या कडुन आभार व्यक्त करण्यात आले
0 Comments