वरवंडी ते शिदोंडी रस्त्याचे उपोषण शासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे


[ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत]

संगमनेर(प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला वरवंडी ते शिदोंडी घाट रस्ता एस.टी.बी.टी.एस.एच‌.६७ हा थापलिंग खंडोबा ठाकरवाडी मंदिर रस्ता ठेकेदाराच्या चालढकलपणा मुळे दळणवळणासाठी अयोग्य झाला होता पठारावरील अतिशय महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम वर्पे यांनी नुकताच तहसीलदार,गटविकास अधिकारी संगमनेर वरवंडी ग्रामपंचायत यांना पत्रव्यवहार करून २५ मार्च रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

शासन स्तरावर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून उपोषण कर्त्यास  ‌लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की संबंधित ठेकेदाराने हे काम करण्यास विलंब केल्याने सदर ठेकेदारावर आम्ही दंडात्मक कारवाई करुन त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले आहे ‌हे काम सदर ठेकेदाराकडून काढून घेत नवीन निविदा राबविण्यात आली आहे.नवीन निविदा १ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु निविदा खुली करण्याच्या कालावधीत आचारसंहिता लागू झाल्याने पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही ती प्रक्रिया निवडणूक झाल्यानंतर होईल त्यानंतर रस्त्याचे पुढील काम सुरू होईल असे लेखी आश्वासन शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक कैलास कराळे यांनी उपोषणकर्ते गौतम वर्पे यांना देतातच रिपाइंच्या वतीने हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषण स्थळीं रिपाइंचे अमोल राखपसरे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भोसले शाखा अध्यक्ष भरत भोसले अमोल माकरे जावेद मनियार प्रदीप भोसले सुभाष गागरे सागर भोसले किशोर डोखे चैतन्य डोखे साहिल खवळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे