श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शिर्डीत श्री साई संस्थान तर्फे दिनांक 16 ते 18 एप्रिल 2024 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन!

शिर्डी ( प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत श्री रामनवमी उत्सव 2024 विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 ते गुरुवार 18 एप्रिल 2024 या दरम्यान शिर्डी येथे साईसंस्थांनतर्फे तीन दिवस श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे.

शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवानिमित्त साईबाबा संस्थान तर्फे पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती ,पहाटे ५.४५ वाजता श्रींच्या पोथी व फोटोची मिरवणूक, सकाळी सहा वाजता श्री द्वारकामाईत श्री साईसतचरित्राचे अखंड पारायण, सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता श्रींची पाद्यपूजा ,दुपारी साडेबारा वाजता श्रींची मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी साडेतीन ते साडेपाच या कालावधीत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम ,तसेच दुपारी चार ते सहा या वेळेत कीर्तन होणार असून सायंकाळी साडेसहा वाजता श्रींची  धुपारती नंतर साडेसात ते साडेनऊ निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम, रात्री सव्वानऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक, रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान श्रींची शेजारती ,पालखी मिरवणूक परत आल्यानंतर होणार आहे. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर या दिवशी रात्रभर खुले राहणार आहे.
श्रीराम नवमीच्या मुख्य दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5.15 वा. श्रींचे काकड आरती, पावणे सहा वाजता अखंड  पारायण समाप्ती, व त्यानंतर श्रींच्या पोथी व फोटोची मिरवणूक, नंतर सकाळी 6.20 वा. दरम्यान श्रींचे मंगल स्नान, दर्शन व कावडी मिरवणूक ,सकाळी सात वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान श्रीराम जन्मांवर आधारित कीर्तन कार्यक्रम होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता श्रींची मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी साडेतीन ते साडेपाच या दरम्यान निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम, दुपारी चार वाजे दरम्यान निशाणांची मिरवणूक, त्यानंतर पाच वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक व ही मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची धुपारती, सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम, रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत श्री समोर कलाकारांची हजेरी होणार आहे. श्री साई समाधी मंदिर दर्शनासाठी या दिवशी रात्रभर खुले राहणार आहे.
उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी 6.50 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी सात वाजता श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्रभिषेक, सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम होणार असून दुपारी साडेबारा वाजता श्रींची मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी साडेतीन ते साडेपाच दरम्यान निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होणार असून साडेसहा वाजता श्रींची धुपारती ,सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम व रात्री सव्वानऊ वाजता श्रींची गुरुवारची पालखी मिरवणूक ,रात्री दहा वाजता श्रींची शेजारती होणार आहे. श्रीराम नवमी उत्सवा दरम्यान होणाऱ्या अखंड पारायणासाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्या साई भक्तांनी आपली नावे दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी एक ते 5.20 या वेळेत देणगी काउंटर नंबर एक येथे नोंदवावीत ,त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता समाधी मंदिरातील मुख्य दर्शन स्टेजवर चिठ्ठ्याकाढून पारायण करणाऱ्यांची नावे निवडण्यात येतील. तसेच उत्सवाच्या मुख्यदिवशी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या कलाकार हजेरीच्या कार्यक्रमासाठी  कलाकारांनी आपली नावे अनाउन्समेंट रूममध्ये आगाऊ नोंदवावीत .सोयीप्रमाणे कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार त्रि सदस्य समितीने राखून ठेवला आहे. असेही  या पत्रिकेत म्हटले असून या श्रीराम नवमी उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी. असे आवाहनही या पत्रिकेद्वारे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या त्रि सदस्य समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती सुधाकर  यार्लोगड्डा, समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व साईसंस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या पत्रिकेद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!