अ.नगर जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 61 कोटी रुपये अनुदान!

शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ अ. नगर जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे 61 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत.
राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता पाच रुपये अनुदानाची योजना शासनाने सुरू केली होती .मात्र तंत्रिक कारणाने या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास अडचणी आल्या होत्या. दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाने त्यासाठी दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये म्हणून काही अटी आणि नियमांमध्ये शिथिलता आणल्याने‌‌ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यात मोठी मदत झाली आहे .
अहमदनगर जिल्ह्यातील 67 हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील 2725 शेतकऱ्यांना 15 कोटी 24 लाख 96 हजार तर संगमनेर तालुक्यातील 17 हजार 119 शेतकऱ्यांना बारा कोटी दहा लाख 63 हजार, कोपरगाव तालुक्यातील सात हजार 92 शेतकऱ्यांना पाच कोटी 16 लाख 12 हजार, राहता तालुक्यातील बारा हजार पाच शेतकऱ्यांना 11 कोटी 60 लाख 67 हजार, श्रीरामपूर तालुक्यातील ६४५४ शेतकऱ्यांना पाच कोटी 82 लाख ३१००० ,नगर तालुक्यातील 2138 शेतकऱ्यांना 21 कोटी 55 लाख 7000, नेवासा तालुक्यातील 4 हजार 68 शेतकऱ्यांना चार कोटी 82 लाख चाळीस हजार ,पारनेर तालुक्यामधील 5814 शेतकऱ्यांना चार कोटी ब्यांशी लाख 40 हजार, पाथर्डी तालुक्यातील 2ह.78 शेतकऱ्यांना दोन कोटी 75 लाख 34 हजार, राहुरी तालुक्यातील बारा हजार पाच शेतकऱ्यांना अकरा कोटी साठ लाख 67 हजार, श्रीगोंदा तालुक्यातील सहा हजार 454 शेतकऱ्यांना पाच कोटी 82 लाख 31 हजार एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारी जिल्ह्यातील दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती विभागांनी संकलित केली असून हे दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळाला आहे .अशा शेतकऱ्यांची संख्या 29 हजार 441 असून या शेतकऱ्यांना पाच कोटी 23 लाख 66 हजार 915 रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी या विभागाने 15 एप्रिल पर्यंत मुदत वाढवली असल्याचेही या विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.या निर्णयामुळे दूध उत्पादक सभासदांमधून ,शेतकऱ्यांमधून  समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे