शिर्डी ( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्ली येथील केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याणचे सचिव श्री अपूर्वा चंद्रा, यांच्यासह आरोग्य विभागाचे केंद्र व राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी नुकतीच भेट दिली. व पाहणी केली, विविध अडी अडचणी संदर्भात चर्चा केली , विविध मार्गदर्शन केले.
अपूर्वा चंद्रा (भा. प्र. से) (सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग केंद्र शासन, दिल्ली,) मा.डॉ.विजय बाविस्कर (सहसंचालक, तांत्रिक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई) मा.डॉ. गोविंद चौधरी (उपसंचालक(EPI ,SFWB)पुणे,) मा.डॉ.कपिल आहेर (उपसंचालक परिमंडळ नाशिक,) मा.डॉ.संजय घोगरे (जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर) व मा. डॉ. बापूसाहेब नागरगोजे (जिल्हा आरोग्य अधिकारी, अहमदनगर) व डॉ.अमोल शिंदे (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, अहमदनगर) व मान.डॉ.विनोद काकडे (जिल्हा बाल संगोपन अधिकारी अहमदनगर) यांच्या पथकाने नुकतीच राहाता तालुक्यातील प्राथमिक. आरोग्य. केन्द्र सावळीविहिर या ठिकाणी भेट देऊन आरोग्य सेवक,आशा स्वयंसेविका यांच्याशी संवाद साधला व सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी मान श्री. जालिंदर पठारे (गटविकास अधिकारी पंचायत समिती राहाता) मा.डॉ.संजय घोलप सर (तालुका आरोग्य अधिकारी साहेब पंचायत समिती राहाता) व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments