लोणी, प्रवरा कारखाना येथे महसूल मंत्री ना. विखे पा. यांची उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!

लोहगाव( प्रतिनिधी)
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारखाना कार्यस्थळावरील पुतळ्याला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून या महामानवाला अभिवादन केले.
यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते.
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोणी बुद्रुक येथे जनसेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहता तालुक्यात ठीक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करण्यात आला. अनेक शहरांमध्ये चौका चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
आज सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत होता. विविध ठिकाणी दिवसभर कार्यक्रम सुरू होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमही ठिकठिकाणी राबविण्यात आले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे