लोहगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

लोहगाव (प्रतिनिधी,) राहता तालुक्यातील लोहगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करत सर्वांनी जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन केले.
 यावेळी झालेल्या कार्यक्रमात सचिन दुशिंग यांनी अतिशय सुंदर भाषण करत तरुण पिढीला गुन्हेगारी कडे न वळता आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावेन असे काहीतरी करावे .असे भाषणाद्वारे नवीन पिढीला अतिशय सुंदर संदेश दिला. व तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगते यावेळी व्यक्त केले .यावेळी लोहगाव सोसायटी चे विद्यमान चेअरमन राजेंद्र केरुनाथ चेचरे, मा. सरपंच गणेश चेचरे, किशोर चेचरे, दत्तात्रय चेचरे, सदस्य बळीराम चेचरे, किरण चेचरे, अजित चेचरे, साईनाथ चेचरे, माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे, सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरे, माजी उपसरपंच सुरेश चेचरे, धनंजय आहेर, शरद चेचरे, परवेज पठाण,पत्रकार शरद तांबे, पत्रकार आदिनाथ कडु, बंटी शिरसाट, प्रविण दुशिंग, योगेश रोकडे, रामा पवार,रामा बनसोडे, स्वप्नील शिंदे, संदीप पगारे, योगेश रणधीर, महेश लांडगे,सागर भुजंग,सागर सोनवणे,अनुराग वनसे, सचिन सोणवने,रुषी कदम, दीपक पगारे,सागर राऊत,कीरण सुरडकर, महेश सुरडकर,  सुकदेव चेचरे,जालु नरोडे, सुनिल काकडे रवी तुपे, सभांदींडे टेलर,कडुबाळ तुपे, शंकर उजागरे, नितिन कोल्हे, सचिन ठोंबरे, विशाल कदम,राहुल कदम,अवि घोगरे, प्रशांत घोगरे,शुभम घोगरे, गणेश गायकवाड, मार्गदर्शक पंकज भालेराव , महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे नियोजन सम्राट युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रविराज क्षेत्रे उपाध्यक्ष प्रसाद कदम यांनी अतिशय सुंदर  कार्यक्रमाचे नियोजन केले व कार्यक्रमाची सांगता तुपे मामा यांनी केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, आंबेडकर प्रेमी नागरिक महिला उपस्थित होते.
मार्गदर्शक पंकज भालेराव यांनी १६ /४/२०२४ रोजी भव्य मिरवणूक संध्याकाळी ६ ते १०  आयोजित केली आहे प्रमुख आकर्षण S :B :AUDIO /LIGHTS कोल्हार तरी सर्व भीमसैनिकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे व भव्य मिरवणूक सोहळ्याचा आनंद घ्यावा,ही नम्र विनंती आयोजक सम्राट युवा प्रतिष्ठान लोहगाव

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे