अखेर त्या बातमीची दखल, लोहगावातील जलजीवनच्या कामाला गती



लोहगाव  / प्रतिनिधी  :  राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना अखेर गती मिळाली यासंदर्भात छत्रपती एक्सप्रेस सह अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल गावातील प्रमुखांनी व  सरपंच ,उपसरपंच  ग्रामपंचायत पदाधिकारी , सदस्य यांनी पुढाकार घेऊन संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देऊन काम युद्ध पातळीवर सुरू केले.   जलजीवन मिशन योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील लोहगाव येथे जलवाहिन्या टाकण्याचे काम ठेकेदाराने सूरू केले होते मात्र हे काम रेंगाळले असल्याने जलवाहिन्यांच्या खोदलेल्या गटारामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती तर महिला मुले या गटारात पडून किरकोळ जखमीही झाले होते यासंदर्भात स्थानिकांनी पत्रकारांना यासंदर्भात आवाज उठविण्याचे आवाहन केले होते त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, पोर्टलसह अन्य समाजमाध्यमातून ही बातमी ठळकपणे झळकली होती 
   अखेर पद्मश्री विखे पा. कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब कुंडलिक चेचरे, लोकनियुक्त सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरे तसेच  ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व प्रशासनाशी तातडीने संपर्क करत यशस्वी शिष्टाई कामाला आली नि अतिशय कासव गतीच्या कामाला सशाची गती मिळाली युध्दपातळीवर हे काम सुरू झाल्याने स्थानिक ज्येष्ठ नागरिक,  पदाधिकारी व नागरिकांनी पत्रकारांना धन्यवाद देत कौतुक केले आहे .

  

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे