माहिती अधिकार व जलजीवन मिशन कामाविषयी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आण्णा हजारेंना साकडं

 



राहुरी/ प्रतिनिधी  - माहिती अधिकार कायद्याचं प्रशासनाकडून सर्रास ऊल्लंघन केलं जात आहे बरोबरच  जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातली काम आर्थिक देवाणघेवाणीत सुमार दर्जाची होत असल्याची तक्रार अहमदनगर जिल्ह्याच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाने थेट आण्णा हजारेंना करत याविषयी साकडे घालत लक्ष घालण्याची विनंती केली त्यांनीही तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दुरध्वनीद्वारे दखल देण्याच्या सुचना दिल्या 
   युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे पा,  जिल्हाध्यक्ष महेश भोसले, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, निमंत्रक राजेंद्र म्हसे, राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, सचिव रमेश जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र पवार सह संघाच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर लोकप्रतिनिधी नाहीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सध्या ठप्प झाले आहेत प्रशासनाचे अधिकारी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीसारखेच गुळमुळीत उत्तर देत आहेत पर्यायाने सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही 
   राज्य व केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठ्याची कामे फक्त अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने सुमार दर्जाची  सुरू आहेत स्थानिक ठेकेदार मनमानी करत असून अंथरलेल्या पाईपलाईन जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, राज्य मार्ग तसेच मुख्य जिल्हा मार्गाच्या अगदी लगत व कमी खोलीवर  टाकण्यात आल्या असून हे सर्व काम अत्यंत घाईगडबडीत झाले आहे  जलजीवन मिशन ही योजना भविष्यकाळातील साधारण ४० ते ५० वर्ष ग्रामीण व शहर  भागाला वरदान ठरणारी अशी महत्त्वाची व महत्वाकांक्षी योजना शासनकर्त्यांनी प्रस्तावित केली असताना या योजनेला तिलांजली देण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असल्याचे आण्णा हजारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे 
   या प्रश्नांची दखल घेत यावर प्रशासनाने कारवाई करावयास हवी यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे ते प्रसंगी म्हणाले व  पत्रकार संघाने जनतेच्या अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नी लक्ष घातले असल्याबद्दल कौतुकही केले.
    माहिती अधिकार कायद्यासंदर्भातली लढाई जनतेने हाती घेत त्याला जन आंदोलनाचे स्वरूप देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले भविष्यकाळात ही लढाई आणखी लढावी लागणार असल्याचेही ते म्हणाले  

   

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे