सोनगाव (शकुर तांबोळी) - डॉ.ताजणे उमेश अण्णासाहेब यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. उमेश ताजणे हे सोनगाव येथील रहिवासी आहेत. ते एम.कॉम., एम.फिल., पीएच.डी., नेट जे.आर.एफ., एस.आर.एफ., बीएड. तसेच विविध संगणक अभ्यासक्रमात उच्च विद्या विभूषित आहेत.
त्यांना 17 वर्षांचा पदवी व पदव्युत्तर शिकवण्याचा व संशोधनाचा अनुभव, 5 वर्ष कनिष्ठ महाविद्यालयीन समन्वयक असा अनुभव असून सध्या ते पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात वाणिज्य, व्यवस्थापन व संशोधन विभागात कार्यरत आहे. या विभागात सध्या 34 विद्यार्थी विद्यावाचस्पती संशोधन करत आहेत. डॉ.ताजणे सरांनी 72 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावर संशोधकीय मार्गदर्शन केलेले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे 2 लाख रुपये अनुदानाचे दोन लघु संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. आयसीएसएसआर या संस्थेकडे 5 लाख 82 हजार रुपयाचा लघु संशोधन प्रकल्प प्रस्तावित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच मानांकित संशोधन पेपर व 2 पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत.
त्यांच्यावर उच्च महाविद्यालयातील विविध महत्त्वपूर्ण जबाबदारी असून विविध महाविद्यालयांच्या स्थानिक सल्लागार समितीमध्ये तज्ञ म्हणून त्यांनी काम केलेले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आविष्कार संशोधनांमध्ये त्यांनी जज म्हणून काम केलेले आहे.
एकूणच शिक्षण संशोधन व विद्यार्थी प्रिय अशा अनेक स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेने दिला आहे याबद्दल त्यांचे श्री .राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहमदनगर-अकोला जिल्हा, खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील, सदस्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, माननीय सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा अहमदनगर जिल्हा परिषद यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
0 Comments