संगमनेर (प्रतिनिधी) शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार दौरा जोरात सुरू असताना काल संगमनेर तालुक्यातील वरवंडी गावाला त्यांनी भेट दिली.यावेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
वरवंडी पंचक्रोशीसह प्रत्येक गावात त्यांनी उपस्थित नागरिकांच्या सोबत संवाद साधला,येथील प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या.विकासाबात त्यांनी आपले व्हिजन लोकांसमोर मांडले.वरवंडीसह पठार भागात लोकप्रतिनिधीची तिरकस नजर लोकसेवकांचा अल्पवेळ यामुळे येथील गावात विकास हा फक्त नावालाच दिसतो.या गावांतील पाणी प्रश्नावर त्यांनी नागरिकांशी सखोल चर्चा केली सत्तेत आल्यानंतर पठारावरील पाण्याचा महत्वाचा प्रश्न जिकरीने सोडवुन सर्वच गावै पाणीदार बनवु आणि शोषित वंचित दुर्लक्षितासह सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहु तसेच येथील शिक्षण आदी अनेक प्रश्न सोडवु असे आश्वासन यावेळी रुपवते यांनी दिले.
प्रसंगी तरुण आणि महिला वर्गाची गर्दी लक्षणीय होती पठार भागातुन त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
0 Comments