भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे मंगळवारी उमेदवारी अर्ज करणार दाखल !


जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे मंगळवारी उमेदवारी अर्ज करणार दाखल !

 मुरबाड दि.२९-(बाळासाहेब भालेराव ) लोकसभा निवडणुकीच्या २० मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. २३-भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अगदी कमी वेळेत लोकांच्या पसंतीस उतरलेले अपक्ष उमेदवार आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश सांबरे हे मंगळवार,  ३० एप्रिल रोजी आपला निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरणार आहेत. 
सकाळी १० वाजता निलेश सांबरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोंबडपाडा, भिवंडी येथून निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे रवाना होणार आहेत. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उभे असलेले निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीसह खानदेश सेना, भापसे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, बळीराज सेना महाराष्ट्र व 
कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यासह असंख्य संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे. जिजाऊ संघटनेने जनतेसाठी केलेल्या अनेक लोकोपयोगी कामांमुळे निलेश सांबरे यांना सर्वसामान्य जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे