प्रत्येक मावळा गड किल्ल्यांच्या जीवावर लढला-प्रा.बाळासाहेब वाघमारे [अध्यक्षस्थानी असलेल्या पिंपळ झाडांमुळे नवीन प्रथेला सुरवात]


 संगमनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३६७ वा जयंती समारंभा निमित्ताने संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील आंबेडकर नगरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.बाळासाहेब वाघमारे यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले यावेळी अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी पिंपळाचे झाड होते तर प्रमुख उपस्थितीत गावचे उपसरपंच बादशहा बोरकर,होते.
प्रसंगी पुढे बोलताना प्रा वाघमारे म्हणाले की वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी चार संस्कृत ग्रंथ लिहिले.शत्रू सैन्यांनी अनेकदा महाराष्ट्रावर हल्ले,आक्रमणे केली तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा गड किल्ल्यांच्या जीवावर आणि भक्कम साथीने शत्रु सैन्यावर तुटून पडला त्यामुळे आज प्रत्येकानी गड किल्ल्यांचे रक्षण केले पाहिजे तसेच तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
प्रसंगी शेतकी संघाचे व्यवस्थापक अनिल थोरात गावचे पोलीस पाटील बाळासाहेब दिघे,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिक यादव, डॉ.राजेंद्र कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे,संदिप काकड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,
 यावेळी जयंती समारंभात महिला पुरुष व लहान मुले ही मोठ्या संख्येने उपस्थित होते,
 प्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक  इंद्रजीत थोरात व संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांच्याकडून स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी खेळणी वाटप करण्यात आल्या,तसेच दिलीप यादव,दादासाहेब यादव,साहेबराव यादव, बाळासाहेब गायकवाड,चंद्रकांत थोरात यांच्याकडून मुलांसाठी शालेय साहित्य व वह्यावाटप करण्यात आल्या,जयंती अभिवादन सभेचे आयोजन सचिन मोकळ,संदीप राजाराम यादव,रावसाहेब यादव, बाळासाहेब चव्हाण,अजय चव्हाण,अमित थोरात,विनायक चव्हाण,गोकुळ रूपवते,आदींनी केले होते गावचे आरोग्य दूत डॉ. राजेंद्र कोल्हे यांच्याकडून सर्व उपस्थिततांसाठी शीत पेयाची व्यवस्था केली होती.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे