लोहगाव (वार्ताहर)वाढदिवस म्हटले कि घरातील सर्वांनाच त्याच प्रमाणे आई-वडिलांना देखील फार आनंद होतो.परंतु जन्मतः अनाथ असणाऱ्याला त्यांचे दुःख हे त्यांनाच विचारा परंतु त्यांच्या दुःखात सहभागी होऊन आपला आनंद दुगुणीत करण्याचे काम अक्षय इनामके यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त केले नुकतेच केले आहे .
अक्षय यांनी आपला वाढदिवस राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयात आपला वाढदिवस साजरा केल्याने तेथील अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य निर्माण झाले.साजरा केलेला वाढदिवस व अभिष्टचिंतन हा कार्यक्रम म्हणजे अनाथांना प्रेम दया क्षमा शांती शिकविणारा आहे असे मत अनेकांनी व्यक्त करून आपल्या बरोबर अनाथ विद्यार्थ्यांना देखील आपल्या आनंदात सहभागी करून घेऊन खरा आनंद कशात आहे हे त्यांनी शोधले त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.झालेल्या या कार्यक्रमामुळे समाजात असा संदेश जातोय प्रत्येक तरुणांनी नव्या पिढी समोर असे आदर्श ठेवले पाहिजे त्यातुन तरुण भारतीय संवेदनशील आणि परिपक्व निर्माण होईल.
या वाढदिवसा प्रसंगी विद्यार्थ्यां समवेत पप्पू इनामके .रोहित डांगे, संतोष जायभाय. विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
0 Comments