लोहगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लोहगावचे सरपंच शशिकांत पठारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारेकेली आहे .
लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळ्यावर आंदोलन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा राज्यातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संपूर्ण राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. प्रसिद्धीचा स्टंट करताना आपण काय करतो याचे भान आमदार जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. अशी गंभीर व निंदनीय घटना करून त्यांनी एक प्रकारे अवमानच केला आहे. राजकारणाचा वापर करणाऱ्यांचा चेहरा त्यामुळे उघडा पडला आहे तरी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांना पक्षातून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून त्यांनी दिला आला आहे. यावेळी महेश भाऊ सुरडकर, महेश कांबळे ,आनंद सुरडकर, मधुकर पगारे,हरिभाऊ दुशिंग ,कडू बाळ तुपे ,दादा पवार, राजू मंडलिक, निखिल हिवाळे, सागर सोनवणे, बंटी नरोडे, सुरेश शेलार ,अशोक खरात, योगेश लिंगायत, जय ओहेळ व प्रज्ञा सूर्य बौद्ध विकास संस्था व लोहगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आले.
0 Comments