मुरबाड (बाळासाहेब भालेराव) मुरबाड तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात चर्चेत असणाऱ्या गुलाबी कातकरी वाडी शेलारी व ग्रामस्थ मंडळ शेलारी, दहिगाव यांच्या वतीने भव्य निसर्ग मित्र संमेलन व चंदन परिषदेचे आयोजन दिनांक २८ जून रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता करण्यात आले आहे.
या संमेलनाचा भाग म्हणून सान्वी सोशल वेल्फ़ेअर संस्था संस्थापक अध्यक्षा समाज सेविका ईशा नायक यांनी १ हजार रोपे उपलब्ध करून दिली असून पांडुरंग कृपा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी वृक्षरोपणासाठी मदत करणार आहेत तर चंदन तज्ञ श्रीकांत गोरे चंदन उत्पादक महासंघ महाराष्ट्र राज्य संचालक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चंदन रोपे अल्प दरात ५०/-रुपये उपलब्ध होणार आहेत. श्री अविनाश पाटील टीम परिवर्तन व खिळे मुक्त झाड संस्था , मधुमक्षिका पालन सुभाष इसामे,उद्योजक चंद्रकांत पष्टे सिया ग्रिन क्रिएशन यांच्याकडून २०० तुळशीची रोपे व बागबगीचा ,सर्प रक्षक प्रवीण भालेराव रानभाज्या प्रदर्शन महेश रूमाले व अलकाताई अनिल वाघ,, बांबू काम संताजी घोरपडे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. या अगोदर दोन निसर्ग मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात हजारो निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते. निसर्गाप्रती प्रेम वाढवून निसर्ग जतन व संवर्धन व्हावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे संमेलनासाठी पुणे, मुंबई, अहमदनगर, पालघर, रायगड या जिल्ह्यातून निसर्गप्रेमी येणार असून निसर्गप्रेमींनी या संमेलनात सहभाग घ्यावा तसेच वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक लेखक, इतिहास संशोधक व निसर्गमित्र योगेंद्र बांगर यांनी
0 Comments