मुरबाड (बाळासाहेब भालेराव )मुरबाड मध्ये कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक आज पार पडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील मतदारांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती. मुरबाड येथील सुभाष पवार जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते व मतदारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.तर शिवसेनेच्या बुथवर मतदारांना चांगली व्यवस्था केल्याने मतदारांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे.
माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी यावेळी भेट देउन नियोजनाची पाहणी केली. व शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, शिवसेना जिहा सचिव कांतिलाल कंटे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पवार, मुरबाड बाजार समिती सभापती लक्ष्मण सरनिंगे, खरेदी विक्री संघ चेअरमन किसन गिरा, जि. प. सदस्या प्राजक्ता भावार्थे, माजी जि.प.सदस्य संजय पवार,माजी उपसभापती अनिल देसले, सचिव धनाजी दळवी, पंचायत समिती सदस्य, बाजर समिती सर्व संचालक, खरेदी विक्री संघ सर्व संचालक तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments