वरवंडीचे वनरक्षक बापू सोपान वर्पे यांचा ‌सेवापुर्ती सोहळा उत्साहात



आश्वी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील वनरक्षक बापू सोपान वर्पे हे आपली ३७ वर्षांची वन सेवा संपवून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने त्यांचा येथे सेवापुर्ती सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
              गावातील पठारावर असलेल्या श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा मंदिरासमोर वनपरिमंडळ अधिकारी श्री अल्हाट भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग दोन श्री केदार यांच्या उपस्थित हा सेवापुर्त्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वनमंडळ अधिकारी श्री गवळी श्री सांगळे खांबाचे वनरक्षक सौ पवार कौठे मलकापूरचे वनरक्षक व्दरकानाथ कांबळे श्री पुंड भाऊसाहेब मेहेत्रे उपस्थित होते वनरक्षक बापू वर्पे हे १९८७ पासून वरवंडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून वरवंडी मध्ये अतिशय कमी पावसाच्या भागांमध्ये सुद्धा एक अतिशय सुंदर असे जंगल उभारले आहे. त्यांच्या कार्य काळामध्ये सर्वात जास्त वृक्ष लागवड व  उत्कृष्टरीत्या संगोपन केले हा पट्टा विशेषतः शेतीपूरक नसून येथे प्रामुख्याने मेंढपाळ समाज जास्त प्रमाणावर आढळतो यामुळे गाय पालन, शेळी मेंढीपालन या भागामध्ये जास्त आहे अशा भागामध्ये वनरक्षक म्हणून काम करणे हे खूप कठीण आहे.तरी देखील त्यांनी आपलं कर्तव्य अतिशय चोख पणे बजावत उत्कृष्ट असे जंगल आपल्याला या भागामध्ये पहावयास मिळते त्यांनी आपल्या या सेवेमध्ये आदिवासी समाजाबरोबर सर्वाना एकत्र समाज घेऊन आपली सेवा उत्कृष्टरित्या बजावली या सर्वांना विश्वासात घेऊन झाडांचे महत्त्व समजून सांगून त्यांना ते पटवून दिले  त्यांच्या या कार्याची पावती म्हणून आज  त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती केली होती.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे