दहिगाव-ने येथिल विद्यार्थी वैभव संतोष टाक याने वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेत यशाला घातली गवसणी !


लोहगाव (प्रतिनिधी)जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा नीट परीक्षेत यश मिळवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील
दहिगाव-ने गावासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी वैभव संतोष टाक  याने वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. आरोग्य सेवेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोणी(ता.राहाता) येथील लातूर पॅटर्न क्लासच्या या विद्यार्थ्यांने  ७२० पैकी ६२१ गुण मिळवले आहेत .
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या नँशनल इलिबिटी टेस्ट (नीट) परीक्षेचा ऑनलाईन निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यात वैभव टाक यांने हे घवघवीत यश संपादन करून आपला प्रवेश निश्चित केला आहे.शेतकरी कुटुंबातील असलेल्या वैभव टाक याने यशाला गवसणी घालून दहिगाव-ने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.लोणी (ता,राहाता) येथील लातूर पॅटर्न क्लासचे संचालक प्रा. विजय भोसले सर,प्रा.निर्मळ सर,प्रा. पवन तांबे सर, प्रा. शेखर सर,प्रा. चौधरी सर, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
 दरम्यान वैभव टाक याने आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, लातूर पॅटर्न क्लास चे सर्व शिक्षक व  शक्षकेतर वर्ग या सर्वांना दिले.तसेच  क्लास मधील सर्व लोकांचे मोलाचे मार्गदर्शनच उपयोगी ठरल्याची प्रतिक्रिया त्याने यावेळी व्यक्त केली. वैभव टाकचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे