गावाच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करू-- सौ सुरेखा शेळके
राहाता तालुक्यातील आडगाव बु ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.सुरेखा प्रविण शेळके यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
आडगाव बुद्रुक चे मावळते उपसरपंच वसंत शेळके यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.
काल आडगाव बु। ग्रा.प. च्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच पुनमताई बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ९ पैकी ६ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी सौ. सुरेखा शेळके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ग्रामविकास अधिकारी तथा अध्यासी अधिकारी श्री देवेंद्र वारुळे यांनी सौ सुरेखा प्रवीण शेळके यांची बिनविरोध निवड घोषीत केली.
यावेळी, ग्रा.प. सदस्य संजय शेळके, भिमराज शेळके, अशोक लहामगे,शारदा साळवे कैलास शेळके, कुंडलिक शेळके जयवंत शेळके,तुकाराम शेळके रामनाथ, शेळके, सुनिल बर्डे , प्रविण शेळके, राजेंद्र शेळके ,गोरख शेळके, दत्तात्रय शेळके, रावसाहेब शेळके, सुभाष शेळके, रामदास शेळके,बाळासाहेब शेळके , शिवाजी शेळके ,सचिन शेळके, नानासाहेब शेळके, संदिप शेळके, सोमनाथ शेळके, शिवाजी राऊत,सुनिल शेळके भारत शेळके, अतुल शेळके विवेक शेळके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन उपसरपंच सौ सुरेखा प्रवीण शेळके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आडगाव बुद्रुक च्या नूतन उपसरपंच सुरेखा प्रवीण शेळके यांनी सर्वांचे आभार मानत आपणावर दिलेली उपसरपंचाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे सांभाळू व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ,मान.सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावांमध्ये विविध विकास कामे राबविण्यास प्रथम प्राधान्य देऊन गावाचा विकास अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न करू ,असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
0 Comments