कृषिकन्यांनी सांगितले ऊस बेणेप्रक्रियेचे महत्त्व

पुणे प्रतिनिधी,
लाटे माळवाडी ता. बारामती जि. पुणे

डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय बारामती येथील कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत  गावामध्ये शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रात्यक्षिकयुक्त उपक्रम रावबत आहेत.
त्यामध्ये त्यांनी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी ऊस पीक चर्चासत्र आयोजित केले होते. 
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया सध्याची गरज आहे. सध्या रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. उसामध्येसुद्धा शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. ऊस उत्पादनामध्ये घट येण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा अभाव हे प्रमुख कारण आहे. बहुतेक शेतकरी वर्षानुवर्षे जुने, निस्तेज झालेले, अशुद्ध, रोगट, किडके, खोडवा पिकातील ऊस बेणे म्हणून वापरतात. यामुळे उगवण कमी होते. पीक जोमदार नसते आणि असा ऊस रोग-किडींना लवकर बळी पडतो. म्हणून ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्‍यक आहे. कमीत कमी खर्चात होणारी ही प्रकिया भविष्यात येणाऱ्या रोग किडींवर मात करू शकते अशी माहिती कृषिकऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले आणि तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करून पाहण्याचे आवाहन कृषिकन्यांनी केले.

या प्रात्यकक्षिकाला कृषिकन्या प्रगती पवार ,  ईशा हिरणावळे , जानवी मुसळे, तनया काटकर , अनुजा गवळी , साक्षी जाधव आणि सिद्धी पुंडे यांच्या समवेत गावचे सरपंच सौ. उज्वला खलाटे, उपसरपंच सौ. नंदा सोनवणे , तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य , व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नाना दानवले,माजी उपसरपंच दिलीप बनकर , कृषिसहाय्यक  सोनवणे साहेब आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
शेतकऱ्यांचा प्रतिसात देखील चांगला मिळाला. शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न कृषिकन्यांना विचारून शंकेचे निरसन करून घेतले आणि कृषिकन्यांचे कौतुक देखील केले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही बुरुंगले आणि प्रा. ए. एच. करपे यांचे मार्गदर्शन  या कृषिकन्यांना होत आहे ‎<This message was edited>

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!