माळवाडी ( बारामती) छत्रपती एक्सप्रेस प्रतिनिधी,
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालयातील कृषीकन्या प्रगती पवार , ईशा हिरणावळे , जानवी मुसळे, तनया काटकर , अनुजा गवळी , साक्षी जाधव आणि सिद्धी पुंडे यांनी गावामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम रावबत आहेत. यामध्ये त्यांनी शेतकरी बांधवांना अमेझॉन किसान अँप विषयी मार्गदर्शन देण्यासाठी अमेझॉन मधून सिनियर ऍग्रोनॉमिस्ट श्री तेजस जाधव सर आणि श्री प्रदीप भापकर सर यांना आमंत्रित केले होते. त्यांनी शेतकऱ्यांना अमेझॉन किसान अँप ची सध्याची गरज समजून सांगितली.
वारंवार एकच पीक घेतल्याने शेतातील कस कमी होऊन जमीन नापीक होते,त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला,अन्य फळभाज्या अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी जेणेकरुन जमिनीतील सेंद्रिय घटक वाढतील आणि जमिनीची सुपीकता वाढेल.तसेच वारंवार एकच प्रकारच्या किटकनाशकचा वापर केल्यामुळे त्या किटकांमध्ये त्या औषधांना प्रतिकार करण्याची शक्ती वाढते आणि किटकांवर त्या किटकनाशकांचा प्रभाव कमी होतो. त्यावर योग्य उपाय करणे आवश्यक आहे. शेतीतील अशा अनेक गोष्टींचा विचार करून अमेझॉनने हे अमेझॉन किसान ॲप लाँच केले आहे. त्यामध्ये शेतकरी विनामूल्य नोंदणी करून हवामानाचा अंदाज , वेगळे किडींचा प्रादुर्भाव व त्यावर योग्य उपाय अशी विविध माहिती मिळवू शकतो. तसेच भाजीपाला आणि फळभाज्या शेतकरी अमेझॉन च्या मदतीने मार्केटिंग करू शकतो . त्यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळण्यास मदत होते.
अशी सर्व माहिती अमेझॉन ॲपच्या सहकाऱ्यांनी दिली
या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रात्यक्षिकाला कृषि महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. एस.पी.गायकवाड , प्रा. एस. व्ही. बुरुंगले , प्रा. आरती भोईटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
0 Comments