दौंड मनमाड महामार्गावर धावणाऱ्या सर्व जलद व शिर्डीला जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे गाड्या पुणतांब्याला थांबाव्यात यासाठी 15 ऑगस्ट ला पुणतांबा येथे ग्रामस्थांचा रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा!

शिर्डी (प्रतिनिधी) 
मनमाड दौंड या रेल्वे मार्गावर महत्त्वाचे पुणतांबा रेल्वे स्थानक असून येथे शिर्डीला येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच सर्व मनमाड दौंड अशा धावणाऱ्या जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा ,यासह अन्य विविध मागण्यासाठी पुणतांबा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  यासाठी मंगळवारी विशेष ग्रामसभेचे पुणतांबा येथे आयोजन करण्यात आले आहे.
पुणतांबा हे श्री संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी सह विविध मंदिरामुळे एक प्रसिद्ध शहर आहे.ते ऐतिहासिक तसेच धार्मिक तीर्थस्थान असून येथे ब्रिटिशांनी त्याकाळी दौंड मनमाड रेल्वे मार्गावर हे पुणतांबा रेल्वे स्थानक बांधलेले असून येथे चार-पाच वर्षांपूर्वी शिर्डीला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबा होता. पण त्या आता थांबत नाहीत. त्याचप्रमाणे येथे दौंड मनमाड जाणाऱ्या येणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होत असून गाव व परिसरातील व्यवसायावरही याचा परिणाम झालेला आहे. तेव्हा येथे शिर्डीला जाणारा येणाऱ्या तसेच दौंड व मनमाड कडे जाणाऱ्या सर्व जलद रेल्वे गाड्या येथे थांबाव्यात. पुणतांबा शिर्डी शटल रेल्वे सुरू करावी.येथे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू करावी. येथे रेल्वेचा माल धक्का सुरू करावा. आदी विविध मागण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 रोजी पुणतांबा येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्यासह पुणतांबा व  पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील होऊन हे आंदोलन मोठे व यशस्वी करावे असे प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले असून‌ या संदर्भात मंगळवारी विशेष ग्रामसभेचे पूणतांब्याला आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे