राहाता( प्रतिनिधी)
तालुक्यातील औरंगपूर शिवारातून एका वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत होती. सदर वाहनाला रोखणाऱ्या दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सदर वाहन चालकाने धक्का देऊन सदर वाहन पळून नेले. यात दोन बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ही घटना नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी घडली आहे .आश्वी पोलिसात सदर वाहन चालवणाऱ्यां चालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गोगलगाव येथील रहिवाशी प्रज्वल दत्तात्रय चौधरी व त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी हे आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची प्लेटिना मोटार सायकल एमएच १७ सीएन ०८८९ यावरून निमगाव जाळी गावातून औरंगपूर रोडने आमचे गोगलराव ता. राहाता येथे जात होतो. तर औरंगपूर शिवारात पाटाच्या कडेने टाटा कंपनीची
तांबड्या पिवळ्या रंगाची गाडी नं. एम. एच २० ईजी ९४८३ही औरंगपूर रोडने गोगलगावकडे जात होती त्यात गावरान २ गायी व ४ वासरे होती. सदर गाडी थांबविण्यासाठी आम्ही आमची गाडी थांबवली व त्यांना हात देऊन गाडी थांबविण्यास सांगितले मात्र त्यांनी आम्हाला धक्का देऊन गाडी सुसाट पळवून नेली. गाडी चालक समद गणी महमंद शेख रा. आश्वी बुद्रुक व दुसरा साहिल सय्यद बसलेला होता त्यांनी धक्कादिल्यामुळे आम्हाला दोघांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांने अंगावर गाडी घातली. यामुळे आमच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा झाल्या मोटारसायकलची खोपडी तुटली व हेंडल बेंड झाले यामध्ये सागर याला जास्त मार लागला म्हणून रूग्णालयात नेले .या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी सदर दोन आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ क ल म ११०, ११८ (१) ३२४ (४) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सुरू आहे.
0 Comments