लोहगाव( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी कलश पूजन करून या सोहळ्याला सुरुवात होणार असून दररोज सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण तसेच सकाळी साडेदहा ते साडेबारा या दरम्यान जाहीर कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी पावणे सहा ते पावणे सात या दरम्यान हरिपाठ होणार आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी भजन संध्याचा कार्यक्रम होणार असून शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी निंबेरे येथील ह भ प मनोहर महाराज सिनारे तर रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी कसारा येथील ह भ प रोहिणी ताई महाराज कार्ले तर सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी कनगर येथील हभप संजय महाराज शेटे यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी राजुरी येथील हभप तुकाराम महाराज बनकर तसेच बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी आडगाव येथील गोरक्षनाथ महाराज देठे तर गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी लोहगाव येथील ह भ प संदीप महाराज चेचरे यांचे कीर्तन होणार आहे. तर शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत संगमनेर वेल्हाळे येथील श्री मुक्ताई आश्रमाचे हभप परमहंस स्वामी मुक्तानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून ह भ प संभाजी महाराज तांबे व विक्रम महाराज शेळके तर मृदुंगसाथ ह भ प दीपक महाराज घोरपडे यांची राहणार आहे .तरी या सर्व कार्यक्रमांचा आडगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन समस्त ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व भजनी मंडळ आडगाव बुद्रुक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments