लोणी येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी निघोज येथे पशुपालकांना चारा उपचाराचे दिले प्रात्यक्षिक!

शिर्डी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील लोणी येथील कृषी महाविद्यालयातील  कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2024 अंतर्गत तालुक्यातील निघोज येथील पशुपालकाना चारा उपचाराचे प्रत्यक्षिक दिले .चाऱ्याचे रूपांतर सकस चाऱ्या मध्ये करण्याकरिता तसेच चऱ्याच्या पोषण मूल्यांचा पूर्ण उपयोग करण्या करिता चाऱ्यावर युरिया,गुळ,मीठ ई. चे मिश्रण करून चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास निकृष्ठ चाऱ्याची पौष्टिकता वाढते.चाऱ्याची चव,पाचकता व त्यातील नत्रचे प्रमाण वाढते त्यामुळे गाई म्हशी चारा खतात.जर प्रत्येक पशु पालकाने त्यांच्या गुरांच्या चाऱ्या करिता चारा प्रक्रिया केली तर हे नक्की त्यांच्या फायद्याचे ठरते. यामुळे पशु पालकांचा खर्च वाचेल चारा वया जाणार नाही असे महत्व कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.प्रात्यक्षिक घेण्यासाठी कृषी महाविद्यालयचे कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.रमेश जाधव सर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विक्रम  अनाप सर ,विषय तज्ञ डॉ.दिपाली तांबे ,प्राचर्य डॉ.विशाल केदारी सर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीक्षा अंत्रे,निकिता दराडे,वनिता धामोरे , रितिका खर्डे, वैष्णवी शेळके या कृषिकन्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे