शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा येथील श्री हनुमान मंदिरात गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून श्रावण मासानिमित्ताने शिवलीलामृत ग्रंथ पारायण हे श्रीपाद शिवकुटी महंत आत्मारामगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिरात होणार आहे. गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ ते बारा या कालावधीत उपस्थित मान्यवरांच्या व महाराजांच्या हस्ते शिवलीलामृत ग्रंथ पूजन व पारायणास सुरुवात होणार असून पारायण वाचन होणार आहे .दुपारी बारा वाजता एकादशी निमित्ताने फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी दोन ते पाच या वेळेत शिवलीलामृत ग्रंथ पारायण वाचन होणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात वाजता संत सेना महाराज, संत नामदेव महाराज व विठ्ठल रुक्मिणी माता यांना येथे मंदिरात अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी आठ ते दहा शिवालीलामृत ग्रंथ पारायणाची सांगता होणार आहे .सकाळी दहा वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेची गावातून टाळ मृदूगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी 11 ते 12 या कालावधीत श्री हनुमान मंदिरात श्रीपाद शिवकुटी महंत आत्मारामगिरीजी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या शिवलीलामृत ग्रंथ पारायण व संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सवात मोठ्या संख्येने सामील व्हावे. असे आवाहन संत सेना महाराज मंडळ ,समस्त भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ
सावळीविहीर बुद्रुक व सावळीविहीर खुर्द यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments