राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई प्रतिमा व ग्रंथ पूजन करून श्री साई सतचरित्र व हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात!

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवार दिनांक 20 ऑगस्टला सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
दरवर्षी येथे श्रावणामध्ये श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह असतो. यावर्षी दिनांक 20 ऑगस्टला या श्री साई सतचरित्र पारायण व हरिनाम सप्ताहला सुरुवात झाली. सकाळी श्री हनुमान मंदिर सभा मंडपात श्री साई प्रतिमा ,श्री विठ्ठल रुक्मिणी माता प्रतिमा, तसेच मृदंग, पखवाद टाळ, विना व तुलसी वृंदावन, कलश यांचे  पूजन  करून श्री साई सच्चरित्र पारायणास सुरुवात झाली. या श्री साई सतचरित्र पारायणासाठी सुमारे 50 साईभक्त बसले आहेत. श्री साई सच्चरित्र पारायण व हरिनाम सप्ताह निमित्त मंदिर व परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तसेच त्यानिमित्ताने दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेत श्री साई सच्चरित्र पारायण , दुपारी भजन,तसेच सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत जाहीर हरी किर्तन होणार आहे. तसेच कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री नऊ ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार 20 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे हभप उत्तम महाराज गाढे ,बुधवारी चिंचखेडा( कन्नड) येथील ह भ प सुरेश महाराज आढाव ,गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट ला नांदुरखी येथील अर्जुन महाराज चौधरी, शुक्रवार 23 ऑगस्टला पैठण येथील ह भ प माधव महाराज पैठणकर, शनिवार दिनांक 24 ऑगस्टला सोनेवाडी येथील ह भ प कविताताई साबळे, रविवार दिनांक २५ ऑगस्टला विंचूर येथील ह भ प निलेश महाराज निकम यांचे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे.तर सोमवार 26 ऑगस्टला  गोकुळअष्टमी निमित्त रात्री दहा ते बारा या वेळेत ह भ प प्रतीक्षा ताई जाधव शिंगवे यांचे श्रीकृष्ण जन्मावर किर्तन होणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ ते साडेआठ यादरम्यान श्री साई सतचरित्र ग्रंथ व श्री साई प्रतिमेची
 गावातून मिरवणूक ,त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा अकोले येथील हभप रमेश महाराज भोर यांचे काल्याचे किर्तन होऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या श्री साई सतचरित्र पारायणाणी व्यवस्था श्री साई सेवा संघ सावळीविहर बुद्रुक तर सावळविहीर बुद्रुक, खुर्द, रुई कोहकी ,कोकमठाण, निमगाव, निघोज येथील भजनी मंडळ, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य म्हणून संदीप महाराज वैद्य तसेच गायनाचार्य म्हणून रावसाहेब महाराज वेताळ व किरण महाराज हारळे यांचे मोलाचे सहकार्य लाभणार असून साऊंड सिस्टिम प्रवीण महाराज कुदळ यांची राहणार आहे. या साई सतचरित्र पारायण सोहळा व हरिनाम सप्ताहाचे ‌हे एकविसावे वर्ष असून मोठ्या धार्मिक उत्साहामध्ये येथे कार्यक्रम संपन्न होत आहेत.या  सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त गावकरी व भजनी मंडळ, साई सेवा संघ,  सावळीविहीर बुद्रुक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!