सरपंच सेवा संघाचा समाजभूषण पुरस्कार बंटी यादव यांना प्रदान

संगमनेर (प्रतिनिधी) राज्यात अतिशय मानाचा आणि सन्मानाचा समजला जाणारा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

समाज कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या बंटी यादव यांनी समाजातील अनेकांना माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडत केली.शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांना बंटी यादव यांनी नेहमी मदतीचा हात दिला आहे लोकांच्या सुख दुःखात ते नेहमी समील असतात एक संवेदनशील कार्यकर्ता असलेल्या श्री यादव यांचे हेच गुण हेरून सरपंच सेवा संघाच्या या पुरस्कारास ते पात्र झाले आहे.

अहमदनगर येथील माऊली संकुलात नुकताच आदर्श सरपंच सोहळा २०२४ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी बंटी यादव यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी राज्यभरातील अनेक सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी संघटित सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे,प्रदेशाध्यक्ष रोहित पवार,ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे