लोहगाव( प्रतिनिधी) नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक या संस्थेच्या आदर्श शिशु विहार, व अभिनव बाल विकास मंदिर, नाशिक या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत.
वरील दोनही शाळांनी पालकांची विविध कारणे काढून व देणगीच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात जणू आर्थिक लुट सुरु केलेली आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार व पालकांनी धरणे आंदोलन केले असता शिक्षण विभागाने या शाळा व्यवस्थापनाला मोठा दणका दिला असून पालकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेले शुल्क पालकांना परत देण्याचे आदेश दिले आहे .तरीही अद्याप ही संस्था पालकांना शिक्षण विभागाचा आदेश न जुमानता वसूल केलेले शुल्क परत देण्यास टाळाटाळ करत आहे . तरी या प्रश्नाकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष देऊन पालकांना व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक महेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रत्येक नवीन प्रवेशासाठी पालकांकडून २५ ते ३० हजार रुपये डोनेशन घेतले जाते, शाळा अनुदानित असून हि अवाजवी देणगीच्या नावाने फी पालकांकडून वसूल केली जाते. पालक शिक्षक संघाची स्थापना न करताच खोटे पुरावे तयार करून शाळेची १५०० व बसची १००० रुपये फी वाढ केलेली आहे. शाळेतून पालकांना पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जाते. पुस्तकांची किंमत ६५० ते ७०० रुपये असून हि प्रत्येक पालकांकडून २२०० रुपये वसूल केले जातात. पालकांना न सांगता तसेच पालक संघाची मान्यता न घेताच मुलांचा गणवेश बदल केलेला आहे. व संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच जास्तीच्या भावात गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली आहे. शाळेत मुलांना खेळायला मैदानावर घेऊन जात तर नाहीच पण तरी हि स्पोर्ट्स गणवेश घेण्याची सक्ती केली आहे. बिल्डींग फंड च्या नावाने ७०० ते ९०० रुपये वसूल केले जातात. शाळा अनुदानित असून हि पालकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी फी च्या नावाने ७५०० रुपये फी वसूल केली जात आहे. मुलांचा विमा न काढताच प्रत्येक विद्यार्थ्याचे २०० रुपये गोळा केले जातात. पालक शिक्षक संघाची समिती तयार न करता प्रत्येक पालकांकडून बळजबरीने ५० रुपये वसूल केले जातात. या सह मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पालकांची जणू एक प्रकारे आर्थिक लुट केली जात आहे. वरील संस्था व शाळा शिक्षण विभागाला हि जुमानत नाहीत. अनेक वेळेस प्रशासन अधिकारी, महानगर पालिका नाशिक यांनी शाळेला व संस्थेला पालकांना माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश देऊन हि अत्तापार्यात माहिती मिळालेली नाही. या संदर्भामध्ये आम्ही सर्व पालक गेल्या एक ते दीड वर्षापासून शाळेकडे, संस्थेकडे तसेच शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे न्याय मागत आहोत. परतू अजून पर्यत आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे शेवटी आम्ही
दि. ०५/०७/२०२४ रोजी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात १२०० ते १५०० पालकांनी धरणे आंदोलन केले. तेव्हा पालकांना लेखी आश्वासन देण्यात आले.
दिनांक ०५/०७/२०२४ रोजी नाशिक महानगर पालिका शिक्षण विभाग यांच्या कार्यालयात प्रशासन अधिकारी यांनी सुनावणी घेतली .त्या सुनावणी मध्ये पालकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. व पालकांच्या बाजूने निर्णय देण्यात आलेला आहे.या आदेशानुसार शाळेने प्रत्येक पालकांकडून घेतलेले २० ते २५ हजार रुपये डोनेशन चे पैसे परत करावेत. असे आदेश झालेले आहेत, अभिनव बाल विकास मंदिर हि शाळा अनुदानित असून हि शाळा व संस्था प्रशासन यांनी पालकांपासून तसेच प्रशासनापासून लपवून ठेऊन शाळा अनुदानित असून हि पालकांकडून ७५०० (सात हजार पाचशे रुपये) फी घेऊन पालकांची लुट केलेली आहे. या संदर्भात प्रशासन अधिकारी, नाशिक महानगर पालिका ,नाशिक यांनी अनुदानित शाळेला कुठल्याही प्रकारे अवाजवी फी घेता येणार नाही. तसेच पालकांनी आत्ता पर्यत भरलेली फी हि परत करावी. असे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आदर्श शिशु विहार हि शाळा विनानुदानित आहे. परंतु शाळेने शिक्षक पालक संघाची नियुक्ती न करताच मागील वर्षापासून १५०० रुपये व बस ची १००० रुपये फी वाढ केलेली आहे. शाळेने शिक्षक पालक संघाची नियुक्ती केलेली नाही. या
संदर्भात पालकांनी सुनावणीत सर्व पुरावे दिले. या वर सुनावणी अधिकारी यांनी पालकांना फी चे १५०० रुपये व बस चे १००० रुपये परत करण्याचे आदेश दिलेले आहेत. शाळेने गेल्या ४ ते ५ वर्षांपासून पालक शिक्षक संघाची स्थापना केलेली नसल्याबाबतचे सर्व पुरावे पालकांनी दिल्यामुळे सुनावणी अधिकारी यांनी पालकांकडून शाळेने पालक संघाच्या नावाने दर वर्षी ५० रुपये वसूल कलेले आहेत. ते सर्व पैसे पालकाना परत करण्याचे आदेश दिलेले आहेत.शाळा दर वर्षी विद्यार्थ्यांचा विमा काढते. या नावाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २०० रुपये घेतात. परतू शाळेने मुलांचा विमा काढलेलाच नाही. या मुळे आज पर्यत पालकांकडून शाळेने व संस्थेने जितके पैसे पालकांकडून वसूलकेलेले आहेत. ते परत करण्याचे आदेश प्रशासन अधिकारी यांनी दिलेले आहेत.
शाळेत शालेय साहित्य विकणे हा अपराध आहे. तरी शाळा पालकांना दर वर्षी बळजबरीने शाळेतूनच पुस्तके विक्री करतात. पुस्तकांची एकूण किमत ६०० ते ७५० पर्यत असून हि आमच्याकडून २२०० रुपये घेतले जातात. तरी आदेशानुसार पालकांचे उर्वरित अत्तापर्यत घेतलेले जादाचे पैसे परत करावेत. तसेच पुढील वर्षापासून पालकांना शाळेतून पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. असे आदेश दिले आहेत.शाळेने बिल्डींग फंड च्या नावाने दर वर्षी प्रत्येक पालकाकडून ७०० ते ९०० रुपये वसूल केलेले आहेत. बिल्डींग फंड घेऊन हि मुलांना बसायला वर्ग नाहीत. प्रत्येक वर्गात ९० ते १०० विद्यार्थी दाटीवाटीने बसवले जातात. तसेच बिल्डींग फंड घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे शासनाचे आदेश आहेत. तरी पालकांकडून बिल्डींग फंड घेऊ नये. जे घेतले असतील ते परत करावेत व पालकांना त्याचा हिशोब देण्यात यावा. असेही आदेश देण्यात आलेले आहेत.
तरी हि संस्था व शाळा पालकांना पैसे परत कण्यास नकार देत असून वारंवार महानगर पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी श्री.पाटील यांच्या आदेशाला न जुमानता पालकांवर अन्याय सूरुच ठेवलेला आहे. अशी माहिती या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक महेश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments