सोनगाव - रयत शिक्षण संस्थेच्या लोणी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयंती दिनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पारंपारिक लेझिम, झांज पथकासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीचे उदघाटन स्थानिक स्कूल कमिटी चे ज्येष्ठ सदस्य मा. बाळासाहेब के.विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडले.विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभागी होत विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन व कर्मवीरांना वंदन केले.दिनांक २२ सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीने सुरुवात झालेल्या ह्या सोहळ्याची सांगता सभेच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शिवाजीराव देवढे , सेवानिवृत्त प्राचार्य अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण मंडळ हे उपस्थित होते . संकुलाचे प्राचार्य श्री.रक्टे एल.सी.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देत विद्यालयाचा गुणवत्ता अहवाल विषद केला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा.प्रा. शिवाजीराव देवढे यांनी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या शिक्षण कार्यावर विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनरल बॉडी सदस्य मा. एकनाथराव घोगरे पाटील,मा.बी.जी.आंधळे साहेब, स्थानिक स्कूल कमिटी चे ज्येष्ठ सदस्य मा. बाळासाहेब के.विखे पाटील, मा.जनार्दन घोगरे पाटील सरपंच लोणी खुर्द ,मा. उत्तमराव आहेर पाटील, सहाय्यक विभागीय अधिकारी मा.प्रमोद तोरणे साहेब,माजी विभागीय अधिकारी मा.अण्णासाहेब साबळे, देणगीदार मा. शैलजाताई अरुण साबळे व आजी माजी रयत सेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी UPSC व MPSC परीक्षेतील उत्तुंग यश प्राप्त करणारे विद्यालयातील माजी गुणवंत विद्यार्थी श्री कुणाल येलमामे, श्री संकेत शिंदे, डॉ. श्रीकांत घोरपडे, कु. ऋतुजा जाधव या व इतरांचा सत्कार समारंभ पार पडला. तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे आभार गुरुकुल प्रमुख श्री किरवे एस एस यांनी मानले तर सर्व सेवकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम पी.डी.ढोकणे, श्रीम ए बी जाधव व श्री एस पी पलघडमल यांनी केले.
सदर कार्यक्रमास लोणी पंचक्रोशीतील अनेक रयतप्रेमी ग्रामस्त,पालक,आजी माजी प्राचार्य व रयत सेवक उपस्थित होते.
0 Comments