शिर्डी (प्रतिनिधी) सर्वधर्मसमभावाची आणि श्रद्धा व सबुरी ची शिकवण देणाऱ्या, तसेच आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशातील, त्याचबरोबर परदेशातील ही विविध शहरातून साईभक्त नेहमी मोठ्या संख्येने येत असतात. साईंचे दर्शन घेऊन समाधानी होत असतात. देशाप्रमाणे ,विदेशातही अनेक ठिकाणी साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांचे मंदिरे बांधले आहेत. अशाच विदेशी साई भक्तांपैकी
दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी इटली, जर्मनी, कॅनडा, अमेरीका, दुबई, युनायटेड किंगडम अशा विविध देशातुन आलेल्या १५ साईभक्तांनी शिर्डीला भेट त्यांनी श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वागत केले. या सर्व परदेशी साई भक्तांनी शिर्डीमध्ये श्री साईंच्या विविध मंदिरांना भेटी दिल्या, माहिती घेतली, मनोभावे दर्शन केले. श्री साईबाबा संस्थान च्या वतीने संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या सर्वांचा शाल देऊन सत्कार केला. हे सर्व परदेशी साईभक्त शिर्डीत ग्रुपने असल्यामुळे इतर साई भक्तांचे व ग्रामस्थांचे त्यांच्याकडे लक्ष केंद्रित होत होते. अनेक ठिकाणी एकमेकांना हात हलवून अभिवादन करण्यात येत होते.
0 Comments